22 पायऱ्यांमधली 'ती' एक पायरी, ज्यावर पाऊल ठेवताच उघडतात यमलोकाचे द्वार; 'यमशिला'चे गूढ तुम्हाला माहिती आहे का?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
जगन्नाथ पुरीचे भव्य मंदिर केवळ देशातील चार पवित्र धामांपैकी एक नाही, तर ते त्याच्या प्राचीन, गूढ आणि अद्भुत परंपरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या 22 पायऱ्यांपैकी तिसरी पायरी विशेष लक्ष वेधून घेते.
advertisement
1/7

जगन्नाथ पुरीचे भव्य मंदिर केवळ देशातील चार पवित्र धामांपैकी एक नाही, तर ते त्याच्या प्राचीन, गूढ आणि अद्भुत परंपरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या 22 पायऱ्यांपैकी तिसरी पायरी विशेष लक्ष वेधून घेते.
advertisement
2/7
या पायरीला 'यमशील' किंवा 'यमशिला' या नावाने ओळखले जाते आणि यामागे एक अत्यंत गहन पौराणिक कथा व आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. ही पायरी पार करणे हे भक्तांसाठी केवळ मंदिराच्या आत जाणे नसून, ते मोक्षाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासारखे आहे, अशी श्रद्धा आहे.
advertisement
3/7
पौराणिक कथेनुसार, जेव्हा पुरीचे राजा इंद्रदुम्न्य यांनी जगन्नाथ मंदिराची स्थापना केली, त्यानंतर लाखो भक्त जगन्नाथांच्या दर्शनासाठी पुरीमध्ये आले. आणि त्यांनतर नकळत नकारात्मक कर्मे वाढू. हीच कुकर्म नाहीशी करण्यासाठी भक्त पुरीमध्ये येऊ लागले आणि स्वर्गात गर्दी वाढली.
advertisement
4/7
भक्त येऊन जगन्नाथांचे दर्शन घ्यायचे ज्यामुळे त्यांची पापं नष्ट होऊ लागली, ज्यामुळे यमराज अस्वस्थ झाले आणि ते थेट जगन्नाथांकडे गेले आणि त्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली.
advertisement
5/7
यावर उपाय म्हणून जगन्नाथांनी त्यांनी यमराजांना पुरीच्या तिसऱ्या पायरीवर वास करण्यास सांगितले. आणि त्यांनी सांगितले की जो भक्त त्या पायरीवर दुसऱ्यांदा पाऊल ठेवेल त्याची सर्व पुण्य नष्ट होतील आणि तो यमलोकात जाईल.
advertisement
6/7
मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य मंदिरापर्यंत एकूण 22 पायऱ्या आहेत. या 22 पायऱ्या 22 प्रकारच्या पापांचे प्रतीक आहेत. 'यमशील' या पायऱ्यांच्या क्रमात तिसरी असून, ती पापांच्या निवारणाची सुरुवात दर्शवते.
advertisement
7/7
जगन्नाथ पुरी मंदिरातील 'यमशील' ही पायरी केवळ दगडाची पायरी नसून, ती हिंदू धर्मातील कर्म सिद्धांत, मोक्ष आणि भक्तीच्या शक्तीचे एक जिवंत प्रतीक आहे. या पायरीवर पाऊल ठेवणे म्हणजे साक्षात भगवंताच्या दरबारात यमराजापासून मुक्त होऊन प्रवेश करण्यासारखे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
22 पायऱ्यांमधली 'ती' एक पायरी, ज्यावर पाऊल ठेवताच उघडतात यमलोकाचे द्वार; 'यमशिला'चे गूढ तुम्हाला माहिती आहे का?