TRENDING:

Shani Astrology: नवीन सालात तरी कुठलं सुख? दोन राशीच्या लोकांना शनिची अडीचकी भरपूर त्रास देणार

Last Updated:
Shani Astrology: आपणा सर्वांना माहीत आहे, ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला न्यायाधीश आणि कर्मफळदाता मानलं जातं. सध्या शनी मीन राशीत आहे, ज्यामुळे मेष, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरू आहे. 2026 मध्ये शनी पुन्हा मीन राशीत वक्री होईल आणि त्याचबरोबर दोन राशींवर शनीची अडीच त्रासदायक होणार आहे.
advertisement
1/6
नवीन सालात तरी कुठलं सुख? दोन राशीच्या लोकांना शनिची अडीचकी भरपूर त्रास देणार
2026 मध्ये शनीची अडीचकी दोन राशींवर राहील. शनीच्या अडीचकीमुळे या दोन राशींना पुढच्या वर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पुढच्या वर्षी शनी वक्री होतील मार्गीही होतील उदय स्थितीत राहतील त्यानं हे वर्ष या राशींसाठी चढ-उतारांनी भरलेलं असेल.
advertisement
2/6
सिंह रास (Leo)2026 मध्ये शनीची अडीचकी सिंह राशीच्या लोकांसाठी काही मिश्र परिणाम घेऊन येईल. शनी हळूहळू कामांमध्ये स्थिरता आणतील. सिंह राशीच्या लोकांवर नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि कामाचा ताण आधीपेक्षा जास्त जाणवेल. पदोन्नती किंवा बदली मिळण्यास विलंब जाणवू शकतो. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास वर्षाच्या मध्यात सकारात्मक बदल दिसू शकतात. जुन्या प्रकल्पांमधील अडकलेली कामं पुढे सरकतील.
advertisement
3/6
सिंह - पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज असेल. अनावश्यक खर्च वाढतील, पण उत्पन्नात देखील सुधारणा होईल. उधार देणं किंवा मोठे गुंतवणूक करणं टाळलेलं चांगलं. नात्यांमध्ये शनीच्या वक्र दृष्टीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर खर्च होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं, मानसिक ताण वाढू शकतो. झोप, डोकेदुखी किंवा थकवा यांसारख्या लहान-सहान अडचणी त्रास देऊ शकतात. दैनंदिन दिनचर्या आणि आहार संतुलित ठेवणं आवश्यक असेल. 
advertisement
4/6
धनु रास (Sagittarius)धनु राशीसाठी शनीची अडीचकी 2026 मध्ये अनेक मोठे बदल घेऊन येईल. हा काळ तुम्हाला जबाबदाऱ्या पार पाडणं, निर्णयांवर ठाम राहणं आणि जीवनाकडे नव्या दृष्टीनं पाहण्याची शिकवण देईल. सुरुवातीला थोडा आव्हानात्मक काळ राहू शकतो, पण शनी तुमच्यात मजबूत आत्मविश्वास जागृत करेल. करिअरच्या दृष्टीने, कामाच्या ठिकाणी शिस्त आणावी लागेल.
advertisement
5/6
2026 मध्ये एखादी मोठी संधी मिळेल, ज्यासाठी तुम्हाला जबाबदारीनं काम करावं लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात आला, तर विचारपूर्वक पाऊल उचला. आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार राहतील. विचारपूर्वक धन खर्च करावं लागेल. सर्वात जास्त बचतीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. एखाद्या जुन्या देण-घेण्यातून दिलासा मिळू शकतो, पण खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल. नात्यांमध्ये, कुटुंबात तुमची भूमिका वाढेल.
advertisement
6/6
धनू - प्रेम संबंधात थोडी कडवटता येऊ शकते, त्यामुळं गोष्टी शांतपणे समजावून सांगणं चांगलं राहील. आरोग्याच्या बाबतीत, हाडं, गुडघे किंवा कंबर संबंधित समस्या उद्भवू शकतात. शनीचा प्रभाव शरीरात थकवा वाढवू शकतो. त्यामुळं 2026 मध्ये आरोग्याची चांगली काळजी घ्या.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astrology: नवीन सालात तरी कुठलं सुख? दोन राशीच्या लोकांना शनिची अडीचकी भरपूर त्रास देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल