Shani Nakshatra Gochar: शनिची माया, आता देऊ लागेल सुखाची छाया! ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून 3 राशी जोमात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Nakshatra Gochar: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनिच्या स्थानात बदल होणार आहे. शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार असून स्वनक्षत्रातून गुरू ग्रहाच्या नक्षत्रात होत असलेले हे गोचर अनेक राशींना लाभदायी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे नक्षत्र परिवर्तन 3 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. शनी सध्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात असून तो आता गुरू ग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिचे हे नक्षत्र परिवर्तन सुमारे चार महिने प्रभाव दाखवेल, याचा विविध राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येईल.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्मफळदाता आणि न्यायदेवता मानला जातो. गुरुच्या नक्षत्रात (पूर्वा भाद्रपद) त्याचा प्रवेश काही राशींसाठी अतिशय फलदायी ठरू शकतो.
advertisement
2/6
मिथुन - हा काळ तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करणारा काळ ठरू शकतो. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे किंवा दीर्घकाळ अडकलेली कामे आता मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली होईल आणि मोठ्या गुंतवणुकीचे चांगले योग जुळून येतील. कुटुंबासोबत आनंदात दिवस घालवू शकाल.
advertisement
3/6
सिंह - शनिच्या नक्षत्र गोचराचे शुभ परिणाम पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल. शनिच्या कृपेने तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल, ज्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. सगळ्या कामात आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
advertisement
4/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी ही स्थिती धन लाभाची संधी घेऊन येईल. अचानक धनप्राप्ती, मालमत्तेतून फायदा किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामांमध्ये शुभ वार्ता मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
advertisement
5/6
कुंभ - कुंभ राशीचे स्वामी शनी असल्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे उघडेल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा चांगला काळ आहे. मोठ्या निर्णय आणि कामांमध्ये भाग्य साथ देईल आणि कुटुंबात सुख-शांती राहील.
advertisement
6/6
शनिकडून शुभ परिणाम मिळवण्यासाठी आणि अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करणे लाभदायक ठरू शकते. शनिदेवाची पूजा करावी आणि 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. गरिबांना काळ्या रंगाचे वस्त्र किंवा उडीद डाळ दान करावी. हनुमानाची पूजा उपासना (हनुमान चालीसा पठण) करणे अत्यंत शुभ मानले जाते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Nakshatra Gochar: शनिची माया, आता देऊ लागेल सुखाची छाया! ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून 3 राशी जोमात