TRENDING:

Astrology: जरा नाही खूप त्रास सोसला! या राशींचे आता उजळणार नशीब; स्वप्न साकार, शनीकृपा

Last Updated:
Horoscope In Marathi : सगळीकडे सकारात्मक ऊर्जा भरून राहील. एखाद्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचं संरक्षण करा आणि सकारात्मक वर्तनावर भर द्या. यश मिळवण्यासाठी मेहनत व निष्ठा हीच गुरूकिल्ली आहे, हे आता सिद्ध होईल. तुम्ही चिकाटीनं केलेल्या गोष्टीमध्ये आता तुम्हाला हवे तसे सकारात्मक बदल घडताना दिसून येतील. ही सृष्टी त्यासाठी योग्य वेळी मदत करेल, यावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार राहा. तुमचे प्रश्न समाधानकारकरित्या सोडवण्यासाठी या भविष्याची मदत होईल. (26 सप्टेंबर 2024)
advertisement
1/12
जरा नाही खूप त्रास सोसला! या राशींचे आता उजळणार नशीब; स्वप्न साकार, शनीकृपा
मेष (Aries) -एखादा नवीन संवाद तुमच्या आय़ुष्याची दिशा बदलून टाकू शकतो. तो योगायोग नाही कदाचित नशीब असेल. तुमचं मन तुम्हाला कुठे नेतं ते पाहा. तेच ऐका. मार्गदर्शकांचा सल्ला घेण्याला प्राधान्य द्या. नव्या संधींचा फायदा घ्या आणि त्यावर पहिल्यांदा कृती करायला घाबरू नका. तुमच्या आर्थिक नियोजनावर सुरुवातीच्या आर्थिक शिक्षणाचा प्रभाव होता. नवीन घडामोडींचा स्वीकार करून आर्थिक प्रवाहाला प्राधान्य द्या. तुमच्या खरेदीच्या पद्धतींबाबत सावध राहा. तुमच्या आरोग्याबद्दल आणि यांत्रिक परिणामांबद्दल जाणून घ्या. स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या व तुम्हाला सोयीची ठरेल अशी दिनचर्या तयार करा.LUCKY Sign – A LifeboatLUCKY Color - MagentaLUCKY Number - 65
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -तुम्हाला हवं असलेलं प्रेम लवकरच तुमच्या आयुष्यात येईल. तुम्हाला हवं असलेलं शांत आणि समाधानी नातं मिळेल. विश्वास ठेवा. यश मिळेल अशी आशा ठेवा. इच्छा असेल तर नाट्यमयतेसाठी तयार राहा. तुमच्या करिअरला आत्ता सगळ्यात जास्त महत्त्व प्राप्त झालं असेल. नव्या जागा, नव्या संधींवर नजर ठेवा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्याबाबत नियमित तपासण्या करा. स्वतःची काळजी घेतल्यामुळे मनाला शांतता लाभेल.LUCKY Sign – A CarnationLUCKY Color - PurpleLUCKY Number - 5
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -तुम्हाला हवं असलेलं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ही सृष्टी काम करत आहे. नवीन संधींचा स्वीकार करा. समाधानी नातेसंबंध तयार होतील, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. जोपर्यंत तुमची नोकरीत भरभराट होत आहे तोपर्यंत तुम्हाला यश मिळू शकतं. प्रयत्नांमध्ये धैर्य दाखवा आणि संधी घेण्यास प्रतिकूल राहू नका. तुमची मेहनत आता फळाला येऊ शकते. तुमचं भविष्य खूप आश्वासक आहे, परंतु तुम्ही किती पैसे खर्च करता त्यावर लक्ष ठेवा. तुमच्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही नवीन शक्यतांचा फायदा घ्या. सूज्ञ तयारी आणि संयमित खर्च करून तुम्ही आर्थिक सुरक्षितता आणि यश मिळवू शकता. कोणत्याही समस्यांचं निराकरण करण्यात सक्रिय राहून आरोग्यची काळजी पहिले घ्या. स्वतःची काळजी घ्या.LUCKY Sign – A Brown BagLUCKY Color – Neon PinkLUCKY Number - 6
advertisement
4/12
कर्क (Cancer) -तुमच्या रोमँटिक जीवनात एक महत्त्वचा निर्णय घ्यावा लागेल. ही एखाद्या नवीन नातेसंबंधाची सुरुवात, वचनबद्धता किंवा जुन्या प्रेमाला पुन्हा उजाळा मिळणं यापैकी काहीही असू शकतं. सर्वोत्तम निवड करण्यासाठी तुमचा अंतःप्रेरणा आणि मनावर विश्वास असणं आवश्यक आहे. भविष्यात काही तडजोडी कराव्या लागू शकतात. भविष्यात यश आणि नवीन संधी मिळू शकतात. पण तुम्हाला लवचिक आणि अनुकूलही राहावं लागेल हे लक्षात घ्या. एखादी नवीन सुरुवात आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. करिअरची नवीन संधी किंवा पैशाचा नवा स्रोत तयार होईल. तुमच्या खरेदीच्या पद्धतींबद्दल सावध राहून या संधींचा वापर करा. आनंद मिळवून देण्यासाठी अर्थपूर्ण आणि सर्जनशील पद्धतींचा शोध घेण्याची वेळ आली आहे.LUCKY Sign – A Ceramic VaseLUCKY Color – Powder BlueLUCKY Number - 16
advertisement
5/12
सिंह (Leo) -रोमॅन्सची नवी संधी लवकरच मिळू शकते. हे एखादं नवीन रोमँटिक नातं किंवा सध्याच्या जोडीदारासोबतचं घट्ट नातंही असू शकतं. ही नवी ऊर्जा तुम्ही साठवून घ्या. यावेळी करिअरमध्ये उलथापालथ आणि विकास होत असेल. बदलासाठी तुम्ही अस्वस्थ व्हाल, पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला आनंद देणारं काम करा. आर्थिक लाभाची संधी मिळू शकते, परंतु खर्चावर लक्ष ठेवा. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर नजर ठेवा आणि कोणत्याही आवेगपूर्ण खरेदीकडे लक्ष द्या. शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर आपल्या गरजा लक्षात घ्या.LUCKY Sign – An EngineLUCKY Color – Charcoal GreyLUCKY Number - 12
advertisement
6/12
कन्या (Virgo) -जीवनात तुमचा आनंद आणि समाधान वाढवण्याची क्षमता असलेल्या एका नवीन व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या सध्याच्या नात्यामध्ये अधिक मोकळेपणानं संवाद आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही तुमची सावधगिरी बाळगू शकता आणि कामाच्या विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. घाईघाईनं निर्णय घेणं टाळा आणि तुमच्याकडच्या सर्व पर्यायांचा योग्य विचार करा. तुमचं उत्पन्न वाढू शकतं किंवा तुम्हाला काही नवीन आर्थिक संधी मिळू शकतात, पण बजेट तयार करताना सावधगिरी बाळगा आणि तुमच्या खर्चाच्या पद्धतींवर लक्ष ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्ही प्रेरित आणि उत्साही राहाल. नियमित तपासणी करून स्वतःची काळजी घ्या.LUCKY Sign – A White RoseLUCKY Color – YellowLUCKY Number - 11
advertisement
7/12
तूळ (Libra) -तुमची लव्ह लाइफ हे चांगल्या आणि वाईट भावनांचं मिश्रण असू शकेल. नवीन प्रेमाची संधी असताना, संभाव्य विवादांपासून सावध रहा. स्वतःशी आणि तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा. करिअरमध्ये संयम आणि दृढता ठेवावी लागेल. तुमच्या मार्गात आव्हानं असू शकतात, परंतु तुमच्या उद्दिष्टांसाठी वचनबद्ध राहा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. शेवटी तुमच्या सगळ्या प्रयत्नांना फळ मिळेल. आर्थिक नियोजन करा आणि भविष्यासाठी बचत करा. व्यायाम, विश्रांती आणि आत्मनिरीक्षणासाठी वेळ काढा. तणाव किंवा चिंता जाणवत असेल, तर सावध राहा व लगेचच त्यावर उपाय शोधा. प्रवासाचा विचार करा किंवा नवीन प्रवासाची सुरुवात करा.LUCKY Sign – A MilestoneLUCKY Color - BeigeLUCKY Number – 10
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -तुमच्या रोमँटिक आयुष्यात काही चढउतार येतील. काही अडचणी येतील, पण आशा आणि सकारात्मकताही राहील. कामाच्या ठिकाणी अनेक पद्धतीच्या अडथळ्यांवर तुम्हाला मात करावी लागेल. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. तुमच्या खरेदीच्या सवयींमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. आवेगपूर्ण खरेदी टाळा आणि आर्थिक शिस्त राखा. नवीन रोमांचक प्रवास आणि साहस अनुभवण्याची ही वेळ आहे. मन मोकळं ठेवा, साहसाचा आनंद घ्या.LUCKY Sign – A SparrowLUCKY Color – SaffronLUCKY Number - 25
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -तुमच्या जीवनात प्रेम आणि रोमॅन्सचा काळ येणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमध्ये सकारात्मक ऊर्जा राहील. यामुळे तुमचं जोडीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल किंवा एखादं नवीन नातं तयार होईल, पण संभाव्य गैरसमज किंवा वादांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि विकासाच्या संधी दृष्टीपथात आहेत. तिथे स्पर्धा आणि मत्सरापासून सावध राहा. आर्थिक परिस्थितीबाबतही सकारात्मक वातावरण राहील. तुमच्या विकासासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक उद्देशांबाबतच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करा आणि जास्त पैसे देणं टाळा. तुमच्यात सर्व अडथळे पार करण्याची आणि जिंकण्याची क्षमता आहे. स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा आणि शारीरिक आणि भावनिक गरजांचं संतुलन करा. प्रवास सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे तुम्हाला नवीन अनुभव मिळतील आणि वैयक्तिक प्रगती होईल.LUCKY Sign –An AquariumLUCKY Color – PinkLUCKY Number - 16
advertisement
10/12
मकर (Capricorn) -तुमच्या लव्ह लाइफमध्ये एखादा साहसी बदल घडेल. कदाचित एखादं नवं नातं तयार होऊ शकतं. गैरसमज किंवा विसंवाद होणार नाही, याची काळजी घ्या. करिअरमध्ये संपन्न आणि प्रगतीचा काळ आहे. करिअरमध्ये तुमची ओळख प्रस्थापित होईल किंवा तुम्हाला अनपेक्षितरित्या एखादी संधी दिली जाईल. आत्मसंतुष्ट किंवा गर्विष्ठपणा टाळा कारण याचे भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण अविचारीपणे खर्च करणं किंवा कृती करणं टाळा, त्याचा घातक परिणाम होऊ शकतो. तुमचं शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सुधारेल. प्रवासासाठी एखादं नवीन ठिकाण किंवा आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडेल. स्वतःची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा.LUCKY Sign – A Copper VesselLUCKY Color – BlueLUCKY Number - 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -तुमच्या नातेसंबंधांमध्ये दृढ संपर्क आणि समर्पकता राहील. सुंदर, प्रेमळ आणि शांत नातं तयार होण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये एखादा अवघड निर्णय किंवा कठीण परिस्थिती हाताळावी लागण्याची शक्यता आहे. व्यावसायिक परिवर्तन किंवा बदल गरजेचा आहे. यामुळे प्रगतीच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात, पण आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्ये समतोल राखण्याच्या पद्धती शोधण्याची गरज आहे. अचानक एखादी सुट्टी तुम्हाला स्वतःची प्रगती व स्वतःबद्दलचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडेल.LUCKY Sign – A LampshadeLUCKY Color – SilverLUCKY Number - 4
advertisement
12/12
मीन (Pisces) -प्रेम आणि नातेसंबंधांबाबत तुम्हाला फायदेशीर ठरेल अशी ऊर्जा मिळेल. तसंच भावनिक परिपूर्णता साध्य होण्याची शक्यता आहे. मात्र काही गैरसमज किंवा मतभेद होऊ शकतात, त्यासाठी मोकळेपणानं संवाद साधण्याची गरज आहे. करिअरमध्ये काही संधी येतीलही, पण संभाव्य अडचणी किंवा वादांबाबत तुम्ही सावध असलं पाहिजे. ते हाताळण्यासाठी संयम आणि मुत्सद्देगिरी ठेवावी लागेल. नियमित व्यायाम, समतोल आहार आणि स्वतःची काळजी घेता येईल अशी दिनचर्या ठेवा. यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. येत्या काळात काही प्रवासाचे बेत ठरू शकतात. यामुळे नवे अनुभव आणि नवे साहस अनुभवता येईल, मात्र अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहा. वास्तवात आणि मजेत जगा.LUCKY Sign – A Jewelry BoxLUCKY Color – GoldLUCKY Number - 50
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: जरा नाही खूप त्रास सोसला! या राशींचे आता उजळणार नशीब; स्वप्न साकार, शनीकृपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल