एका वर्षाची प्रतीक्षा संपली! सूर्याची वर्षभरानंतर होणार 'या' राशीत एन्ट्री; रातोरात 5 राशींचं नशीब चमकणार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. मात्र एका वर्षानंतर सूर्य पुन्हा आपल्या भ्रमणचक्राचा शेवट करून 'या' राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. मात्र एका वर्षानंतर सूर्य पुन्हा आपल्या भ्रमणचक्राचा शेवट करून मीन राशीत प्रवेश करणार आहे. 14 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 01 वाजून 01 मिनिटांनी सूर्याचे मीन राशीत आगमन होईल.
advertisement
2/7
सूर्याचे हे संक्रमण 'मीन संक्रांती' म्हणून ओळखले जाते. तब्बल 12 महिन्यांनंतर सूर्याचे मीन राशीत पुनरागमन झाल्यामुळे 5 राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचे द्वार उघडणार आहे.
advertisement
3/7
मेष - परदेश प्रवास आणि लाभाचे योग: मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर आर्थिक प्रगती घेऊन येईल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. नोकरीत तुम्हाला नवीन अधिकार मिळतील. गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ संकेत असून समाजात तुमचा दबदबा वाढेल.
advertisement
4/7
मिथुन - करिअरमध्ये सुवर्ण संधी: तुमच्या दहाव्या भावात सूर्य विराजमान होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल आणि वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही कठीण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल.
advertisement
5/7
कर्क - नशिबाची भक्कम साथ: सूर्याचे हे संक्रमण तुमच्या नवव्या भावात होत आहे. नशिबाची साथ लाभल्यामुळे तुमची रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. तीर्थयात्रेचे योग जुळून येतील. वडिलांच्या मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता असून, तुमच्या धार्मिक कार्यातील सहभागामुळे मानसन्मान वाढेल.
advertisement
6/7
वृश्चिक - अचानक धनलाभ आणि प्रगती: वृश्चिक राशीसाठी सूर्य पाचव्या भावात प्रवेश करत आहे. यामुळे तुम्हाला अनपेक्षित मार्गांनी पैसे मिळतील. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल, तर त्यातून मोठा फायदा होईल. मुलांच्या बाबतीत एखादी शुभवार्ता कानावर येईल आणि तुमची मानसिक अस्वस्थता दूर होईल.
advertisement
7/7
मीन - आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचा विकास: सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. समाजात तुमची प्रतिमा उजळेल आणि तुम्ही नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. सरकारी क्षेत्रातील कामात यश मिळेल. जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे नियोजन करू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
एका वर्षाची प्रतीक्षा संपली! सूर्याची वर्षभरानंतर होणार 'या' राशीत एन्ट्री; रातोरात 5 राशींचं नशीब चमकणार