TRENDING:

Surya Gochar 2025: खात्यातील बँलन्स पाहून सुखाचा धक्का! तीन ग्रहांचा लकी योग 4 राशींना खुश करेल

Last Updated:
Surya Gochar Astrology : हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. उद्याच्या शनिवारी उत्पत्ती एकादशी साजरी होत आहे. या एकादशीला वेगळं महत्त्व आहे. एकादशीचं व्रत-उपवास सुरू करण्यासाठी ती सर्वात शुभ एकादशी मानली जाते. एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी, ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतोय.
advertisement
1/5
खात्यातील बँलन्स पाहून सुखाचा धक्का! तीन ग्रहांचा लकी योग 4 राशींना खुश करेल
वृश्चिक राशीत सूर्याचा प्रवेश ज्योतिषीय गणनेनुसार खास ठरत आहे. कारण त्यामुळं एक दुर्मिळ योगायोग जुळत आहे. मंगळ, बुध आणि सूर्य यांची त्रिग्रही युती वृश्चिक राशीत होत आहे. याचा चार राशीच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येईल. या राशींना करिअर आणि आर्थिक आघाड्यांवर अनपेक्षित फायदे मिळतील. या राशींविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/5
मिथुन - वृश्चिक राशीत सूर्याचे होणारे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांना लकी ठरेल. पैसा-समृद्धीच्या बाबतीत तुम्हाला सगळीकडून गुडन्यूज मिळतील. घरात आर्थिक स्थिरता राहील आणि खात्यातील बँलन्स पाहून समाधान वाटेल. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा कर्ज दिले असेल तर परतफेड होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला नफा देईल. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रतिष्ठित स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.
advertisement
3/5
वृश्चिक - 16 नोव्हेंबरपासून नशिबाची साथ वृश्चिक राशीच्या लोकांना मिळेल. गोचर करून सूर्यदेव वृश्चिक राशीच्या पहिल्या घरात प्रवेश करेल. या काळात तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. एकंदरीत तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे खूश होतील. प्रगतीच्या पथावर तुम्हाला पुढे जाता येईल, उत्पन्न आणि पदोन्नतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित करिअर आणि व्यवसायात नफा होईल.
advertisement
4/5
मकर -मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याची ही स्थिती अतिशय शुभ राहील. पूर्वी केलेले प्रयत्न आणि शिकलेल्या कला तुमचे उत्पन्न वाढवतील सोबतच अनावश्यक खर्च कमी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. तुम्हाला विविध मार्गांनी पैसा मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे लवकर पूर्ण होतील. नातेवाईक किंवा जवळच्या मित्राच्या मदतीने, एखादे मोठे काम यशस्वी होऊ शकते.
advertisement
5/5
कुंभ - भाग्य चमकण्याच्या यादीत कुंभेच्या लोकांचा समावेश असणार आहे. सूर्य गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल, नोकरी व्यवसायात प्रगती पाहाल. नोकरी करणाऱ्यांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. अपेक्षा नसताना पगारवाढ होईल, शिवाय व्यावसायिकांना उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. दीर्घकाळापासून डोक्याला टेन्शन असलेल्या गोष्टी आता संपतील, ज्यामुळे जीवाला शांती मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Gochar 2025: खात्यातील बँलन्स पाहून सुखाचा धक्का! तीन ग्रहांचा लकी योग 4 राशींना खुश करेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल