TRENDING:

मकर संक्रातीला सूर्याचे उत्तरायण होताच 4 राशींचा गोल्डन टाईम सुरू, कोण होणार मालामाल?

Last Updated:
Astrology News :  नव्या वर्षाची म्हणजेच 2026 ची सुरुवात उत्साहात झाली असून या वर्षातील पहिला मोठा सण मकर संक्रांती आहे.
advertisement
1/7
मकर संक्रातीला सूर्याचे उत्तरायण होताच या 4 राशींचा गोल्डन  टाईम होणार सुरू
नव्या वर्षाची म्हणजेच 2026 ची सुरुवात उत्साहात झाली असून या वर्षातील पहिला मोठा सण मकर संक्रांती आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व दिले जाते. वैदिक पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच क्षणापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच सूर्याची हालचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे होऊ लागते. धार्मिक दृष्टिकोनातून उत्तरायणाचा काळ शुभ, सकारात्मक आणि प्रगतीचा मानला जातो. ज्योतिषांच्या मते, सूर्याच्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येऊ शकते. विशेषतः मकर संक्रांतीपासून चार राशींसाठी भाग्याचे नवे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. या राशींच्या अडचणी कमी होतील, कामांमध्ये यश मिळेल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करताच सकारात्मक ऊर्जा वाढते. या काळात सूर्याचे तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण अधिक प्रभावी ठरतात. उत्तरायणाचा हा कालखंड काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
3/7
मेष - मेष राशीच्या जातकांसाठी मकर संक्रांतीनंतरचा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. सूर्याच्या उत्तरायणामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि कामातील अडथळे दूर होतील. काही आव्हाने समोर येऊ शकतात, मात्र तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही त्यावर सहज मात कराल. नोकरीत प्रगती, पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागतील.
advertisement
4/7
वृषभ -  वृषभ राशीसाठी सूर्याचे संक्रमण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील, तसेच व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
5/7
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांतीनंतर भाग्याचा उदय होईल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास, उच्च शिक्षण किंवा नवीन प्रकल्पांसाठी अनुकूल काळ आहे. काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे जीवनाची दिशा बदलू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.
advertisement
6/7
सिंह - सिंह राशीसाठी मकर संक्रांतीपासून सकारात्मक बदलांची सुरुवात होईल. सूर्याच्या प्रभावामुळे नेतृत्वगुण अधिक प्रबळ होतील. नोकरीत प्रगती, नवीन ऑफर किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मित्र किंवा भागीदारांसोबत नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो. एकूणच, हा काळ सिंह राशीसाठी यश, प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरेल.
advertisement
7/7
<strong>(सदर बातमी फक्त महितीकरीता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
मकर संक्रातीला सूर्याचे उत्तरायण होताच 4 राशींचा गोल्डन टाईम सुरू, कोण होणार मालामाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल