TRENDING:

Smart TV खरेदी करणं होणार महाग! या 2 कारणामुळे वाढू शकतात किंमती

Last Updated:
स्मार्टफोननंतर आता तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागतील. मेमोरी चिप्सच्या कमतरतेसोतबच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये LCD पॅनलचेही शॉर्टेज येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6
Smart TV खरेदी करणं होणार महाग! या 2 कारणामुळे वाढू शकतात किंमती
मुंबई : मेमोरी चिप्सच्या कमतरतेमुळे स्मार्ट फोनच्या किंमती या झपाट्याने वाढत आहेत. आता याचा परिणाम स्मार्ट टीव्हीसह दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवरही होणार आहे.
advertisement
2/6
एका रिपोर्टनुसार सॅमसंगच्या co-CEO टीएम रोह यांनी म्हटले की, मेमोरी चिप्सच्या कमतरतेचा परिणाम सर्वच कंपन्यांवर झाला आहे. कारण सॅमसंगसह अनेक कंपन्या आपल्या महाग मॉडल्समध्ये मेमोरी चिप्सचा वापर करतात. यामुळे स्मार्ट टीव्ही तयार करण्याचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम प्रोडक्टच्या किंमतीवर पडेल.
advertisement
3/6
LCD पॅनलही होणार महाग : स्मार्ट टीव्ही महाग होण्यामागे केवळ मेमोरी चिप्सची कमतरता हेच एकमेव कारण नाही. गेल्या काही काळापासून LCD पॅनल तयार करणाऱ्या कंपन्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहेत. खरंतर HKC, BOE आणि CSOT सारख्या अनेक चायनीज मॅन्युफॅक्चररने लेबर कॉस्ट कमी करण्यासाठी पुढील महिन्यात आपल्या ऑपरेशन सस्पेंड करण्याची तयारी केली आहे. यामुळे बाजारात कमी LCD पॅनल उपलब्ध असतील.
advertisement
4/6
ज्यामुळे त्याची मागणी वाढेल आणि एकदा पुन्हा स्मार्ट टीव्ही कंपन्यांना याच्या किंमती वाढवाव्या लागू शकतात. या व्यतिरिक्त कंपन्यांना याच्या किंमती वाढवाव्या लागू शकतात. या व्यतिरिक्त अनेक कंपन्या आपला स्टॉक भरुन बसल्या आहेत. ज्यामुळे मार्केटमध्ये याची कमतरता होणे सहाजिक आहे.
advertisement
5/6
या साइजच्या टीव्हीवर जास्त परिणाम : ट्रेंडफोर्सच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जानेवारीमध्ये टीव्ही पॅनलच्या किमती वाढण्यास सुरुवात होईल. ज्यामुळे 32, 43, 55 आणि 65 इंच पॅनल महाग होतील. फेब्रुवारीमध्ये प्रोडक्शन थांबल्याने किमती आणखी वाढू शकतात.
advertisement
6/6
हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगभरातील सुमारे 95 टक्के टीव्हीमध्ये एलसीडी पॅनल वापरले जातात. त्यामुळे, किमतीत थोडीशी वाढ झाली तरी त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होईल. असे म्हटले जात आहे की, जर ही परिस्थिती काही महिने अशीच राहिली तर लोकांना स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Smart TV खरेदी करणं होणार महाग! या 2 कारणामुळे वाढू शकतात किंमती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल