Rashichakra 2026: नवीन सालातील तिसरा आठवडा गोल्डन टाईम; सिंहसहित या राशींचे दिवस उजळणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rashichakra 2026: डिसेंबरच्या शेवटानंतर बुध ग्रह वर्ष 2026 च्या तिसऱ्या आठवड्यात राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. हा ग्रह बुद्धी, वाणी, व्यापार, करिअर आणि निर्णय क्षमतेवर थेट प्रभाव दावतो. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी बुधाचे गोचर होणार असून याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होईल.
advertisement
1/4

विशेष म्हणजे बुध मकर राशीत प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य, मंगळ आणि शुक्र ग्रह उपस्थित असतील. या विशेष युतीमुळे अनेक राशींना लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जाणून घेऊया बुधाच्या या गोचरामुळे कोणत्या राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.
advertisement
2/4
बुध ग्रहाचे गोचर व्यक्तीची विचारसरणी, संवादाची शैली आणि कार्यक्षमता प्रभावित करते. मकर राशीतील बुधाचा प्रवेश व्यावहारिक विचार, शिस्त आणि मेहनतीचे फळ देणारा मानला जातो. या काळात केलेले प्रयत्न दीर्घकाळ लाभ देऊ शकतात.
advertisement
3/4
मेष राशीच्या लोकांसाठी बुध गोचराच्या प्रभावामुळे यशाचे योग येतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि तुमची सर्व कामे यशस्वी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि मान सन्मानात वाढ होईल. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. व्यापारात नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
advertisement
4/4
सिंह राशीच्या लोकांना नोकरीच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील आणि प्रेमसंबंधांसाठी देखील काळ अनुकूल असेल. एकंदरीत हे गोचर अनेक अर्थांनी फायदेशीर ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashichakra 2026: नवीन सालातील तिसरा आठवडा गोल्डन टाईम; सिंहसहित या राशींचे दिवस उजळणार