यावेळी अक्षय तृतीयेला दुर्मिळ योग, या 3 राशीच्या लोकांचं नशिब उजळणार, तुमची रास यात आहे का?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जातो. यावर्षी 10 मे रोची अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल. या सणाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ज्याप्रकारे हिंदू धर्मात धनत्रयोदशी आणि दिवाळीचा सण साजरा केला जातो. त्याचपद्धतीने अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
advertisement
1/8

शास्त्रांत या तिथीला स्वयं सिद्ध मुहूर्त असे म्हटले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री हरि विष्णु यांची पूजा केली जाते. ज्योतिष गणनेनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक अद्भुत योग तयार होणार आहे. याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पाहायला मिळू शकतो.
advertisement
2/8
याचा प्रभाव एखाद्या राशीच्या जातकावर सकारात्मक तर एखाद्या राशीच्या जातकावर नकारात्मक पडू शकतो. मात्र, अक्षय तृतीयेच्या दिवशी तीन राशी अशा आहेत, ज्यांचे नशिबच बदलू शकते.
advertisement
3/8
अयोध्येतील ज्योतिष पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, या दिवशी एक अद्भुत योग निर्माण होत आहे. यामध्ये सर्वार्थ सिद्धि योग रवि योग शुक्र आदित्य योग असे अद्भुत योग तयार होत आहेत.
advertisement
4/8
याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पाहायला मिळेल. मात्र, तीन राशीचे लोक मालामाल होऊ शकतात. लेकिन तीन राशि के लोग अक्षय तृतीया के दिन मालामाल हो सकते हैं. जिसमें मेष राशी, वृषभ राशी आणि मीन राशीच्या लोकांचा समावेश आहे.
advertisement
5/8
मेष राशी : अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या जातकाला आर्थिक फायदा होईल, व्यवसायात, करिअरमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
advertisement
6/8
वृषभ राशी : या राशीच्या लोकांचा अक्षय तृतीयेचा दिवस हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. माता लक्ष्मीचा आशिर्वाद मिळेल. व्यापारात वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.
advertisement
7/8
मीन राशी : या राशीच्या जातकाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. समाजात मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील.
advertisement
8/8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
यावेळी अक्षय तृतीयेला दुर्मिळ योग, या 3 राशीच्या लोकांचं नशिब उजळणार, तुमची रास यात आहे का?