Astrology: जणू साडेसातीच मागे लागलेली! या राशींचे आता नशीब चमकणार; शनी देणार कष्टाला यश
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 13, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांना शनिवारचा दिवस फारसा अनुकूल नसेल. कोणत्याही कामामध्ये तुम्हाला संयम आणि स्थिरता बाळगावी लागेल. तुम्ही जे निर्णय घेत आहात, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज तुमच्या आरोग्याबाबतही तुम्ही खबरदारी घेण्याची गरज आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. व्यवसाय विस्तारण्याचे नवे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी कामावरही लक्ष देण्याची गरज आहे. पैशांची पुंजी जमा करण्यासाठी आज आर्थिक परिस्थिती स्थिर ठेवण्याची गरज आहे.Lucky Color : RedLucky Number : 12
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज शनिवारचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप चांगला असू शकतो. कामांमध्ये चांगले यश मिळेल, तसंच खूप मानसन्मानही मिळेल. तुमचे वरिष्ठ आज तुमचं आणि कामाचं कौतुक करतील. मित्रमंडळींसोबत आज भरपूर वेळ घालवण्याची संधी मिळेल. आता आरोग्याच्या फार मोठ्या तक्रारी असणार नाहीत. व्यवसायासाठी काही नव्या प्लॅन्सचा विचार करण्याची गरज आहे. उत्पन्न वाढल्यानं तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकतो. तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला आज यश मिळेल. कामामध्ये मात्र आज आत्मविश्वास बाळगला पाहिजे.Lucky Color : YellowLucky Number : 7
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : शनिवार मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी फारसा अनुकूल नाही. आज आयुष्यात काही चढउतार येऊ शकतात. आज तुमच्या मनात काही भावनिक विचार येऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक समस्यांबाबत आज तुम्ही थोडे चिंतेत राहाल. नोकरदार व्यक्ती त्यांच्या कामावर निष्ठा ठेवतील. पैशांच्या बाबतीत फायदा होईल. आज तुम्हाला हवे तसे पैसे खर्च करता येतील आणि त्या खर्चाचं तुम्हाला समाधानही मिळेल. आर्थिक गणित जुळवण्यासाठी तुम्हाला बजेटचं प्लॅनिंग करावं लागेल. तब्येतीची आज काळजी घेण्याची आवश्यकता आहे, आहाराचं तंत्रही सांभाळा.Lucky Color : MaroonLucky Number : 10
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुमच्या आयुष्यातला अत्यंत खास आणि वेगळा अनुभव आज तुम्हाला मिळेल. सगळ्या कामांमध्ये यश मिळेल आणि आयुष्यात एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचण्याची संधीही मिळेल. पैशाची चिंता मिटेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात आज खूप यश आणि आनंदही मिळेल. निष्ठा आणि वेळ दिल्यानं तुम्हाला कामात भरपूर यश मिळेल. कुटुंबीयांचं सहकार्य आणि आधार मिळेल.Lucky Color : OrangeLucky Number : 4
advertisement
5/12
सिंह (Leo) : आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी फारसा अनुकूल असणार नाही. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहिल्यामुळे तुम्ही कौटुंबिक वादविवाद टाळू शकाल. रागामुळे तुमच्या कामात समस्या निर्माण होतील. तसंच तुम्हाला आर्थिक चणचणही भासेल. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःमधली मरगळ झटकून टवटवीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो; पण स्वतःला त्यासाठी तयार ठेवा आणि दिवस योग्य प्रकारे घालवा.Lucky Color : WhiteLucky Number : 8
advertisement
6/12
कन्या (Virgo) : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आज शनिवारचा दिवस मध्यम असेल. आज कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोणावरही खूप विश्वास ठेवू नका. तसंच आज तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची गरज नाही, उलट शांत राहून तुम्ही तुमचे विचार व्यक्त करा. कौटुंबिक मतभेद टाळण्यासाठी शांत राहून प्रश्न शहाणपणानं सोडवण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये डोक्यात राख घालून घेऊ नका. त्यामुळे कामात समस्या निर्माण होतील, आर्थिक चणचण जाणवेल. मानसिकदृष्ट्या खंबीर राहा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.Lucky Color : Navy BlueLucky Number : 4
advertisement
7/12
तूळ (Libra) : शनिवारचा दिवस उत्तम आहे. हा तुमच्या सर्वांत छान आठवणीतला दिवस बनेल. तुमच्या मनातली एखादी अपूर्ण इच्छा आज पूर्ण होईल. त्यामुळे तुमचं मन खूप आनंदी असेल. त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यग्र असाल. आज कोणतीही गोष्ट आत्मविश्वासानं करण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हाल. तुमचं आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या क्षमतांचा वापर करण्याकडे लक्ष द्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुमचा दिवस आनंदात जावो.Lucky Color : MagentaLucky Number : 6
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : शनिवारचा दिवस एकदम छान असणार आहे. आज केलेल्या कामात शनिदेवाच्या कृपेनं तुम्हाला भरपूर यश मिळेल; मात्र आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक सदस्यांकडून काही खास भेटवस्तू मिळू शकतात. वैवाहिक जीवनही प्रेममय राहील. त्यामुळे जोडीदारासोबतच्या नात्याचे बंध दृढ होतील, विश्वास वाढेल. नोकरदार व्यक्ती आज त्यांच्या कामात व्यग्र राहतील. त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. आवश्यक कामं वेळेत पूर्ण करा. उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद मांडा. आज तुम्हाला प्रत्येक कार्यक्षेत्रात यश मिळेल. आजचा तुमचा दिवस अतिशय शुभ असेल.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : शनिवार तसा फारसा अनुकूल दिसत नाही. तुमच्या मनात गोंधळात टाकणारे विचार येतील. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही कौटुंबिक समस्यांबाबत तडजोडीचं धोरण स्वीकारावं लागेल. कोणत्याही चर्चेशिवाय समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्ती काळजीपूर्वक त्यांचं काम करतील. त्यामुळे त्यांना यश मिळेल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल आणि तुमच्या मिळकतीला आनंदात परिवर्तित करू शकाल.Lucky Color : PinkLucky Number : 11
advertisement
10/12
मकर (Capricorn) : मकर राशीला आजचा दिवस अनुकूल नाही. आज काम करण्यात कित्येक अडचणी येऊ शकतात. शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करू नका. शांत राहिलात, तर कुटुंबात उद्भवणारे वाद टाळता येऊ शकतात. आवडत्या छंदामध्ये वेळ घालवल्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांना आज अभ्यासातून थोडी विश्रांती मिळेल. त्यामुळे जो अभ्यास कराल तो लक्षपूर्वक करा.Lucky Color : BrownLucky Number : 2
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींचा शनिवारचा दिवस अतिशय उत्तम असेल. दैनंदिन कामांमध्ये भरपूर यश मिळेल आणि उत्तम कामगिरी कराल. आज तुमची तब्येतही छान राहील; पण तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आरोग्याची काळजी घ्या. नोकरदार व्यक्ती त्यांच्या कामात व्यग्र राहतील. त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीबाबत काहींना आज चांगली बातमी मिळू शकते. वाढते खर्च आटोक्यात ठेवण्याची गरज आहे. नाही तर भविष्यात समस्या उद्भवू शकतात. उत्साहाच्या भरात कोणतंही काम करू नका. नाही तर तुमच्याविषयी गैरसमज पसरू शकतात.Lucky Color : Sky BlueLucky Number : 11
advertisement
12/12
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी शनिवारचा दिवस खूप छान असेल. कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीची फळं मिळतील. कोणावरही खूप विश्वास ठेवू नका. आज प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. त्याउलट शांत राहा आणि कौटुंबिक वाद टाळा. तुमच्या रागामुळे कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. खर्च थोडा जास्त होऊ शकतो, त्यामुळे पैशांची चणचण भासेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातून मिळालेली विश्रांती खूप फायदेशीर ठरेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी मेहनत करत राहा.Lucky Color : GreenLucky Number : 5
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: जणू साडेसातीच मागे लागलेली! या राशींचे आता नशीब चमकणार; शनी देणार कष्टाला यश