Astrology: प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; शनि-गुरू आलेत भाग्यस्थानी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 11, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कठीण-त्रासाचा जाईल. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. इतरांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत बसू नका. कुटुंबातील वाद टाळण्यासाठी शांत राहा, शब्दाला शब्द वाढवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. खर्च काळजीपूर्वक करावा लागेल. पैशाची कमतरता जाणवेल. मानसिकदृष्ट्या मजबूत राहा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : BlueLucky Number : 5
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आजचा गुरुवाचा दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल. कामाकडे नीट लक्ष द्या, भावनांवर नियंत्रण ठेवा. विचारपूर्वक निर्णय घ्या. ऑफिसमध्ये काम काळजीपूर्वक करा, सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या. आता नियमित व्यायाम गरजेचाच आहे. आज इतरांशी संवाद टाळा. मन शांत ठेवा.Lucky Colour : MaroonLucky Number : 9
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाने वागण्याचा आहे. कोणत्याही कामात शिस्त पाळा. वैयक्तिक व व्यावसायिक संबंधांमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर नीट लक्ष द्या. ध्येय साध्य करण्यासाठी जास्त कष्ट करावं लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. काळजी घ्या. आज शिस्तबद्ध काम करणं फायद्याचं ठरेल.Lucky Colour : RedLucky Number : 4
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कर्कच्या लोकांसाठी आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आजचा ठरेल. अपूर्ण स्वप्नं पूर्ण होतील. मन आनंदी राहील. उत्साह कायम राहील. आरोग्यासाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाचं काम करण्यात तुम्ही व्यस्त राहाल, त्यातून लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात यश मिळेल. अभ्यासातही प्रगती होईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कामात सहभागी झाल्यानं मानसन्मान वाढेल.Lucky Colour : BlackLucky Number : 10
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही नवीन वाहन किंवा घरासाठी एखादी वस्तू खरेदी करू शकता. प्रेम समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराशी नीट बोला दोघांचा समन्वय महत्त्वाचा आहे, त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करण्याची संधी मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळण्याचा योग आहेत.Lucky Colour : YellowLucky Number : 3
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज गुरुवारचा दिवस तसा थोडा कठीण जाईल. नवीन शिकण्याची संधी मिळेल. पण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. दैनंदिन कामात व्यस्त राहाल. तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होऊ शकतो. कोणाकडून एखादी भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. वैवाहिक जीवनात जोडीदारावरील प्रेम दिसून येईल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे.Lucky Colour : PurpleLucky Number : 8
advertisement
7/12
तूळ (Libra) : आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. प्रेमात नवीन नात्याची सुरुवात होईल. अविवाहित व्यक्तीचं लग्न ठरण्याचा योग आहे. घरामध्ये शुभ कार्ये होईल. नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज एखादी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनाला प्राधान्य द्यावं, फायद्याचं ठरेल. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचं ज्ञान उपयुक्त ठरेल.Lucky Colour : Navy BlueLucky Number : 2
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी थोडा कठीण जाईल. पैशाशी संबंधित अडचणींना तोंड द्यावं लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरी, व्यवसायात पैशाची अडचण भासेल. नातेवाईकांशी वाद टाळा, फायद्याचं ठरेल. संवाद साधताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. आज महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू नका. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे. नवीन नोकरी शोधण्यावर भर द्या, त्यात यश मिळेल. जोडीदारासोबत सायंकाळ आनंदात जाईल. मनोरंजनात्मक कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. अविवाहित व्यक्तीचा लग्न जुळण्याचा योग आहे.Lucky Colour : Dark GreenLucky Number : 11
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा गुरुवार खास आहे, प्रत्येक काम आत्मविश्वासानं पूर्ण करा, यश मिळेल. मानसिकदृष्ट्या चांगलं वाटेल. तुमच्या आवडत्या छंदासाठी थोडा वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती घ्यावी लागेल, त्यासाठी योग्य वेळ आहे. आज सायंकाळी एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी झाल्यानं तुमचा मानसन्मान, आदर वाढेल. समजूतदारपणे जोडीदाराशी असणाऱ्या नात्याचं योग्य विश्लेषण करा, फायद्याचं राहील.Lucky Colour : PinkLucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, त्या स्वीकारा. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे. कष्टाचं फळ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. व्यवसायिक दृष्टिकोनातून दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या चांगला नफा मिळेल. दिवसभराच्या गोंधळानंतर आजची सायंकाळ जोडीदारासोबत घालवल्यानं फायदा होईल. तुम्हाला आराम मिळेल.Lucky Colour : BrownLucky Number : 1
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतार घेऊन येणारा आहे. ऑफिसमध्ये काम करताना संयम ठेवावा लागेल. कारण कामाच्या दृष्टिनं आजचा दिवस अनुकूल नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तुमची क्षमता टिकवून ठेवा. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहार निरोगी ठेवा. शरीराला पूर्ण विश्रांती देण्यासाठी वेळोवेळी योग्य आहार घ्या.Lucky Colour : GreenLucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला आहे. ऑफिसमध्ये काम करताना दक्ष रहा. कामासाठी अधिक वेळ द्यावा लागू शकतो, काळजी घ्या. तुमच्या घरगुती आयुष्यातही तणाव राहील. कौटुंबिक बाबतीत शहाणपणानं वागा, संयम ठेवा. व्यवसायातही सावध राहून गुंतवणुकीकडे लक्ष द्या. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करीत असाल, तर त्यासाठी योग्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.Lucky Colour : Sky BlueLucky Number : 6
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला! या 5 राशींचे आता नशीब चमकणार; शनि-गुरू आलेत भाग्यस्थानी