Astrology: त्रास किती काळ सोसला! आता या राशींचे नशीब उजळणार; मंगळ-सूर्याची कृपा लाभणार
- Published by:Ramesh Patil
- Written by:Pooja chandra
Last Updated:
Horoscope In Marathi : जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळाल्याने मेष राशीच्या व्यक्ती उत्साही असतील. वृषभ राशीच्या व्यक्ती सुंदर गोष्टींची प्रशंसा करत त्या गोष्टीशी नातं जुळवतील. मिथुन रास मनात तीव्र भावना असूनही प्रामाणिकपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. कर्क राशीच्या व्यक्तींना एकांतात समाधान मिळेल.यामुळे त्यांचे सखोल भावनिक नातं निर्माण होईल. सिंह राशीच्या व्यक्तींचे नैसर्गिक आकर्षण प्रेम जीवनात रोमँटिक नातं निर्माण करेल. कन्या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक गोष्टीच्या तपशीलाकडे लक्ष द्यावे. कामासाठी ही गोष्ट उपयोगी पडेल. तूळ रास घरात शांत वातावरण राखत प्रेमात संतुलन शोधेल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती उत्कटतेच्या जोरावर वैयक्तिक नातं घट्ट करतील. धनुराशीला साहसाचे आकर्षण असेल. या व्यक्ती भविष्याचा शोध घेण्यासाठी योजना तयार करतील. मकर राशीचा व्यावहारिक दृष्टिकोन करिअरमधले अडथळे दूर करेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन दृष्टीकोन मिळेल. जुन्या सवयी मोडून सर्जनशीलता वाढवाल. मीन राशीचा कल अंतर्ज्ञानाकडे असेल. या व्यक्ती घरी आराम करत शांततेचा आनंद घेतील. (17सप्टेंबर2024)
advertisement
1/12

मेष (Aries) : तुम्हाला ऊर्जा जाणवेल. ही ऊर्जा तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यास मदत करेल. जोडीदाराची इच्छा जसजशी वाढेल,तसं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. घरात सुरक्षितता आणि आराम अनुभवाल. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. पण चिकाटीच्या जोरावर त्यातून मार्ग काढाल. प्रवासाची योजना तात्पुरती स्थगित असली तरी तुमच्या गाठीशी अनेक अनुभव असतील.स्वतःची काळजी घ्या. निरोगी जीवनशैली ठेवा. भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा.LUCKY Stone - An OnyxLUCKY Color - RedLUCKY Number – 57
advertisement
2/12
वृषभ (Taurus) (20एप्रिल ते20मे):सभोवतालच्या सुंदर गोष्टींचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ द्या. प्रेमसंबंध जसजसे वाढतील तसे तुम्ही जोडीदाराशी भावनिकरित्या जोडले जाल. आराम मिळावा यासाठी घरात शांत वातावरण तयार करा. ऑफिसमध्ये तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते. पण धीर धरा,यश मिळेल. सुट्टीच्या प्लॅनमध्ये अडथळे असले तरी जवळच्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी या संधीचा वापर करा.आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.LUCKY Stone – White SapphireLUCKY Color - GreenLUCKY Number – 16
advertisement
3/12
मिथुन (Gemini) (21मे ते21जून):तुमची हुशारी चमकेल. सुसंवाद ही नात्यातील आनंदाची गुरूकिल्ली असेल. घरात सर्जनशील वृत्ती ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आसपास उमटू द्या. कामातील अडचणीवर अनुकूल उपाय शोधाल. प्रवासाची योजना पुढे ढकलली जाऊ शकते. पण या वेळेचा वापर करा. कौशल्य वाढवण्यासाठी ऑनलाइन कोर्स करा. आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक आणि मानसिक संतुलन शोधा. भविष्यातील उद्दिष्ट आशादायी आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या.LUCKY Sign – Wear Turquoise JewelleryLUCKY Color - YellowLUCKY Number – 35
advertisement
4/12
कर्क (Cancer) (22जून ते22जुलै):मनात भावनांचा आवेग असेल. त्याकडे लक्ष द्या. वैयक्तिक जीवनातील लोकांची काळजी घ्या. तुम्हाच्या मताशी प्रामाणिक राहा. प्रियजनांमुळे घरी आराम वाटेल. त्यामुळे घराला आरामदायी ठिकाण बनवा. ऑफिसमध्ये संयमाची परीक्षा होऊ शकते. पण योग्य दिशेने काम करण्याची जिद्द ठेवा. प्रवास मर्यादित असला तरी नवीन अनुभव घेण्याची प्रयत्न करा. स्वतः काळजी घेण्यासाठी आवश्यक गोष्टी करा. सतत कार्यप्रवृत्त राहिल्यास भविष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकाल.LUCKY Stone - PearlLUCKY Color - SilverLUCKY Number - 21
advertisement
5/12
सिंह (Leo) :तुमचं उपजत कौशल्य चमकेल. प्रेमजीवनात तुमची उत्कटता वाढेल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. घरात सकारात्मकता अनुभवाल. कामात अडचणी येऊ शकतात. पण आत्मविश्वासाच्या जोरावर त्यातून मार्ग काढाल. आसपासचे वातावरण ओळखण्यासाठी थोडा वेळ काढा. प्रवासाची योजना नियोजित असली तरी प्रेरणेचा शोध घ्या. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्साहाने वाटचाल करा.LUCKY Stone - AmberLUCKY Color - GoldLUCKY Number -9
advertisement
6/12
कन्या (Virgo) :अचूकतेकडं लक्ष द्या. प्रेमात नातं घट्ट होण्यासाठी मुक्त संवादावर भर द्या. मनातील गोंधळ दूर करून घरात उत्पादकता वाढीसाठी एक चांगली जागा तयार करा. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. पण विश्लेषणात्मक क्षमता वापरून तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्याकडे प्रवासासाठी मर्यादित पर्याय असले तरी आत्मनिरीक्षण आणि विकासासाठी उरलेल्या वेळेचा वापर करा. आरोग्यासाठी तणाव कमी करण्यास आणि विश्रांतीला प्राधान्य द्या. स्वतःवर विश्वास ठेवल्यास भविष्यातील महत्त्वाकांक्षा साध्य करू शकाल.LUCKY Stone – An EmeraldLUCKY Color - BlueLUCKY Number - 13
advertisement
7/12
तूळ (Libra) :तुमचा कल समतोल राखण्याकडे असेल. प्रेमात इतरांशी तह करण्याचा म्हणजे जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सौंदर्यविषयक संवेदना प्रतिबिंबित होतील अशा पद्धतीने घराची रचना करा. कामात अडचणी असल्या तरी त्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर हाताळाल. नियोजनानुसार प्रवास करण्यापेक्षा विविध संस्कृतीतील लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यावर भर द्या. काम आणि विश्रांती यात समतोल राखा. प्रक्रियेवर विश्वास ठेवला तर तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.LUCKY Sign – Possess Rhodonite CrystalLUCKY Color - PinkLUCKY Number – 94
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) :मनातील तीव्र भावना तुमची प्रेरणा असेल. प्रेमात बंध घट्ट करण्यासाठी तुमच्यातील उत्कट भावना स्वीकारा. घरात तुमच्या भावनिक विकास आणि प्रतिबिंबाला प्रोत्साहन देईल अशी जागा तयार करा. कामातील अडचणींवर लवचिकता तुम्हाला मार्ग काढण्यास सक्षम असेल. प्रवासाच्या नियोजनावर मर्यादा असल्या तरी या वेळेचा वापर तुम्ही स्वतः मानसिक परीक्षणासाठी करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची भविष्यातील उद्दिष्टं योग्य आहेत,त्यामुळे त्याकडे लक्ष द्या.LUCKY Stone - GarnetLUCKY Color - MaroonLUCKY Number – 18
advertisement
9/12
धनू (Sagittarius) :तुमची साहसी वृत्ती तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वतःला लवचिक ठेवा. प्रेम जीवनात नवीन अनुभव स्वीकारा. सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला मूर्त स्वरूप देईल अशी जागा घरात तयार करा. ऑफिसमध्ये आव्हानं असली तरी तुमची सकारात्मकता त्यावर उपाय शोधण्यास मदत करेल. रोमाचंक प्रवासाची योजना आखा. कारण यामुळे तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळू शकतो.सक्रिय राहा. आरोग्याची काळजी घ्या. निसर्गात भ्रमंती करा. भविष्यातील महत्त्वाकांक्षा उज्ज्वल आहेत. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करा.LUCKY Stone - AmazoniteLUCKY Color - PurpleLUCKY Number - 21
advertisement
10/12
मकर (Capricorn) :तुमचा वास्तववादी दृष्टीकोन तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. स्थिरता आणि समर्पणामुळे तुमचे प्रेम संबंध सुधारतील. संरचित वातावरण तयार करणे आणि घरात दीर्घकालीन उदिदष्टे साध्य करण्यास प्राधान्य द्या. ऑफिसमध्ये अडचणी येऊ शकतात. पण दृढनिश्चयाच्या जोरावर अडचणींवर मात कराल. प्रवासाचे पर्याय मर्यादित असतील. तरी देखील भविष्यातील यशाची उद्दिष्ट आत्ताच निश्चित करा. आरोग्याची काळजी घ्या. जीवनशैली संतुलित ठेवा. शिस्त राखली तर भविष्यातील उद्दिष्ट साध्य करू शकाल.LUCKY Stone – Tigers EyeLUCKY Color - BrownLUCKY Number – 31
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) :वेगळ्या दृष्टिकोनामुळे चमकाल आणि प्रसिद्धीच्या झोतात याल. नातेसंबंधात वेगळेपणा स्वीकारा. तुमच्या वैशिष्ट्यांचा आदर करणारा जोडीदार शोधा. सर्जनशीलता आणि नाविन्यास प्रोत्साहन देईल अशी स्पेस घऱात तयार करा. ऑफिसमध्ये काही समस्या जाणवतील. पण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची तुमची क्षमता यावर उपाय शोधण्यास मदत करेल. वेळेचा उपयोग नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि ज्ञानवृध्दीसाठी करा. प्रवासाचे नियोजन प्रलंबित राहिल. आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिनचर्येत मनाला शांती देणारे व्यायाम समाविष्ट करा. भविष्यातील तुमच्या योजना गतिमान असल्याने थांबू नका. वाटचाल सुरूच ठेवा.LUCKY Stone- AquamarineLUCKY Color - TurquoiseLUCKY Number – 2
advertisement
12/12
मीन (Pisces) :मनात संशय असला तरी तुमची प्रवृत्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. प्रेमात भावनिक संबंधाला प्राधान्य द्या. तुमचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव स्वीकारा. तुम्हाला मनःशांती मिळावी यासाठी घराला एक शांत आश्रयस्थान बनवा. कामात अडचणी येऊ शकतात. पण सहानुभूतीच्या जोरावर त्यातून मार्ग काढाल. प्रवासाची योजना अचानक पूर्णत्वास गेली तरी तुमच्या कल्पनेचा शोध घेण्यासाठी कलात्मक प्रयत्नावर लक्ष केंद्रित करा. शांतता देतील असे क्षण शोधा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मनाचं ऐकलं तर तुम्ही भविष्यातील उद्दिष्टे साध्य करू शकता.LUCKY Stone - HematiteLUCKY Color – Marine GreenLUCKY Number – 75
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: त्रास किती काळ सोसला! आता या राशींचे नशीब उजळणार; मंगळ-सूर्याची कृपा लाभणार