Weekly Horoscope: नोव्हेंबरचा पहिला आठवडा कसा असेल? ग्रहस्थितीनुसार पहा साप्ताहिक राशीभविष्य
- Written by:Rutuparna Mujumdar
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: आज दिनांक 29 ऑक्टोबर 2023 वार रविवार. आज आश्विन पौर्णिमा समाप्ती. आश्विन कृष्ण प्रतिपदा.या आठवड्यातील ग्रह गोचर आणि चंद्राचे भ्रमण यावर आधारित साप्ताहिक राशी भविष्य पाहूया. या सप्ताहात गुरु मेष राशीत असून राहू-गुरू चांडाळ योग लवकरच समाप्त होत आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होत असून मंगळ, रवि, बुध, तूळ राशीत आहेत. शुक्र दिनांक 31 रोजी कन्या या नीच राशीत प्रवेश करीत आहे. राहू-केतू अनुक्रमे मीन व कन्या या राशीत 31 ऑक्टोबर रोजी प्रवेश करतील. या सप्ताहात चंद्र वृषभ या स्वराशीत भ्रमण करेल. या ग्रहांच्या स्थितीनुसार व लग्नानुसार साप्ताहिक भविष्य पाहुया.
advertisement
1/12

मेष - राशी स्वामी मंगळ तूळ या राशीत आहे. जोडीदाराला शत्रू कष्ट देतील. कन्येचा उदित नीच शुक्र व्यक्तीमत्वात मोह निर्माण करेल. चैनी स्वभाव होईल. मधुमेही लोकांनी सावधगिरी बाळगावी. व्यवसायात संधी निर्माण होतील. राशीतील राहू आता निघून जाणार आहे. वर्तमान काळात त्याचा परदेश प्रवासात फायदा होईल. संभ्रम निर्माण करेल. गुरू उच्च दर्जाची अभिरुची वाढवेल. लाभ स्थानातील शनि मार्गी होत आहे. वृद्ध व्यक्तीं कडून फायदा घडवेल.. गुरू धर्म विषयक आस्था तसेच त्या क्षेत्रात अधिकारी व्यक्तीची भेट घडवून देईल. भावंडाना उत्तम काळ. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. धन चंद्र आर्थिक लाभ घडवेल.. एकूण सप्ताह मध्य उत्तम फळ देणारा ठरेल. गुरू उपासना करावी.
advertisement
2/12
वृषभ - राशी स्वामी शुक्र हा नीच होत असून पंचम स्थानात येत आहे. संततीसाठी शुभ योग निर्माण करेल. प्रवासात सुखद अनुभव येतील. स्वभावात तेज आणेल. गुरू मित्र आणि परदेश दौऱ्यापासून फायदा करून देईल. बहीण भावांशी संबंध सुधारतील. तसेच संपर्क, नवीन ओळखी यापासून फायदा होईल. संतती आनंद देणार आहे. मनावर ताबा ठेवून हा काळ काळजीपूर्वक घालवावा. राहू आणि केतूचे फळ योग्य प्रकारे मिळेल. तसेच परदेशसंबंधी व्यवहार सावध राहून करा, असे आवाहन करीत आहे. सप्ताह चांगला जाईल.
advertisement
3/12
मिथुन - राशी स्वामी बुधाचे पंचम स्थानातील भ्रमण व सूर्य कार्यक्षेत्रात सहज संधी, तसेच पर्यटन क्षेत्रासंबंधी यश दाखवीत आहे. चतुर्थ स्थानात शुक्र घरासाठी मोठा खर्च देईल. कुटुंबाचे पाठबळ कमी राहील. संततीशी जमवून घ्या. प्रवासावर भरपूर खर्च कराल. लाभ स्थान जागृत आहे. नोकरीत फायदा होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ, प्रवास योग, संतती संपत्ती प्राप्ती दाखवीत आहे. घरामध्ये काही आनंदी घटना घडेल. शुभ सप्ताह.
advertisement
4/12
कर्क - राशी स्वामी चंद्र वृषभ राशीत जीवनात लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य मिळेल. दशम गुरू परदेश गमनची संधी निर्माण करेल. तीर्थ क्षेत्राचे प्रवास घडतील. मित्र मैत्रिणीशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे. भाग्यातील राहू हा कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा कारक आहे. योग्य निर्णय घेऊन मार्ग काढावा लागेल. आर्थिक लाभ होतील. तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील. आयुष्यात नवीन वक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. उदित शुक्र भावंडाना चांगले फळ देईल. सप्ताह शुभ जाईल.
advertisement
5/12
सिंह - राशी स्वामी रवि तृतीयस्थानात बुध आणि मंगळ सोबत सहयोग देतील. राहू धर्म विषयक, तसेच व्यवसाय संबंधात कर्ज, बँकेचे व्यवहार इत्यादी घडवून आणेल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. त्याचा योग्य फायदा घ्या. आयुष्यात स्थैर्य राहणार नाही. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करा. फारशी अपेक्षा ठेवू नका. घरामध्ये बदल होतील. द्वितीय शुक्र भरपूर खर्च करेल. मंगळ रागावर ताबा ठेवा, असे सांगत आहे. उत्तरार्ध फायद्याचा असून एकूण सप्ताह उत्तम.
advertisement
6/12
कन्या - राशी स्वामी बुध रविसोबत असून कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण करेल. काही व्यवसायाच्या संधी निर्माण करणार आहे. लिखाणातून फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराला देखील फायदे होऊ शकतात. सामाजिक जबाबदारी वाढेल. तसेच समाजात नाव होईल. सप्तम स्थानात येणारा राहू आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल. शेअर्स लॉटरी पद्धतीने लाभ होईल. काहीही कारण नसताना हुरहूर लागून मन अस्वस्थ राहील. गुरू सर्व आपत्तीमधून मार्ग काढेल. अविवाहित व्यक्तीं जोडीदार निवडताना जपून. सप्ताह उत्तम.
advertisement
7/12
तूळ - शुक्राचे व्यय स्थानातील भ्रमण घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी तसेच व्यावसायिक प्रगती दाखवीत आहे. मंगळ खर्चाचे नवीन मार्ग देईल. शुक्र उदित होत आहे. नकारात्मक लहरी कमी करील. नोकरीत हालचाली कराव्या लागतील. मातृ-पितृ भेट होईल. गुरू नोकरी आणि व्यवसाय यासाठी शुभदायक असून मातुल घराण्याकडून शुभ वर्तमान देईल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. नीट चौकशी करा. तसेच वैवाहिक जीवनात गैरसमज होऊ देऊ नका. चंद्र भ्रमण सुखद व्यावसायिक जीवनाचा लाभ देईल. सप्ताह उत्तम.
advertisement
8/12
वृश्चिक - राशी स्वामी मंगळ व्ययस्थानात असून शुक्र उदित आहे. अत्यंत यशस्वी उपक्रम हाती घ्याल प्रकृती संबंधी त्रास कमी करेल. भांडण टाळा. प्रवास, बंधू भगिनी भेट आणि कला प्रकारात रुची असा हा आठवडा आहे. अनेक नवीन व्यक्तींशी ओळख तसेच संपर्क होईल. संतती प्राप्तीसाठी हा काळ शुभ आहे. सप्तम स्थानातील चंद्र पूर्वार्धात शुभ फळ देईल. धार्मिक कार्यक्रम होतील. प्रवास योग येतील. लाभदायक सप्ताह आहे.
advertisement
9/12
धनु - राशी स्वामी गुरू पंचम स्थानात गृहसौख्य. सामाजिक प्रतिष्ठा, संततीलाभ दाखवीत आहे. घरामध्ये काही सजावट, नवीन सुख सोयी करून घ्याल. पंचमातील राहू कुटुंबात वाढ सुचवीत आहे. अनेक नवीन विषयात रुची निर्माण होईल. पंचम स्थानातील ग्रह आर्थिक लाभ, तसेच घरात काही शुभ घटना दाखवीत आहे. लाभस्थानात मंगळ पराक्रमात वाढ करेल. तसेच शत्रू निर्माण करेल. पण अखेर विजय तुमचाच होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ पण खर्चिक सप्ताह आणि मानसिक ताण दाखवीत आहे. उत्तरार्ध अनुकूल जाईल.
advertisement
10/12
मकर - गुरू ग्रहांचे गोचर चतुर्थ स्थानात असून शुभ फळ देतील. भाग्यात मंगळ आहे. उष्णतेचे विकार सतावू शकतात. मंगळ आकर्षक घराचे स्वप्न पूर्ण करेल. जोडीदारांसाठी पैसे खर्च होतील. गुरू घराबाबतीत शुभ ठरेल. तसेच काही चांगल्या घटना घडतील. प्रवास आणि बंधुभेट घडवेल. तुमच्या संभाषण कौशल्यात विशेष वाढ होईल. शुक्र वैवाहिक जीवनात कुरबुरी करेल. प्रकृती जपा. सप्ताह एकूण चांगला जाईल. शनीची उपासना करावी.
advertisement
11/12
कुंभ - राशी स्वामी शनि स्वस्थानात लवकरच मार्गी होत असून शुभ फळ देईल. चंद्र काही अनपेक्षित पेच निर्माण करू शकतो. आरोग्य जपा. दवाखान्याच्या फेऱ्या तसेच औषध पाण्यावर खर्च होऊ शकतो. काहीही अनाठायी धाडस करू नका. मंगळ भाग्य स्थानात आरोग्य चिंता निर्माण करेल. वाद करू नका. घरात शांतता ठेवा. आर्थिक लाभ तसेच पैतृक संपत्ती यासंबंधी हा आठवडा शुभ आहे. पूर्वार्ध जपून रहा. बुध कायद्याचे भान ठेवा, असे सांगत आहे. उत्तरार्ध मध्यम राहील.
advertisement
12/12
मीन - धन स्थानातील गुरू तसेच अष्टमस्थानात सूर्य बुध, या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या फळ देतील. शेअर्समधून लाभ होईल. शनी कुंभ राशीत काहीसा नकारात्मक अनुभव देईल. पैसा खर्च करेल. प्रवास तसेच बंधू भेट संभवते. पण, प्रकृतीचे त्रास संभवतात. चंद्र संततीसाठी फळ देणारा असून पूर्वार्ध अनुकूल. अष्टम मंगळ जोडीदाराला कष्ट दाखवित आहे. शनी उपासना करावी. उत्तरार्ध प्रकृती जपा असे सांगत आहे. शुभ सप्ताह.शुभम भवतू !!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा पहिला आठवडा कसा असेल? ग्रहस्थितीनुसार पहा साप्ताहिक राशीभविष्य