TRENDING:

Aajache Rashibhavishya: पैसा, प्रतिष्ठा, प्रेम की संकट, तुमच्यासाठी सोमवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
सोमवारी अनेक राशींवर ग्रह नक्षत्रांच्या हालचालींचा परिणाम होताना दिसेल. जाणून घ्या तुमची राशी आजचा दिवस काय दर्शविते.
advertisement
1/13
पैसा, प्रेम की संकट, तुमच्यासाठी सोमवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
मेष राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. विवाहित लोकांसाठी आनंदाचा दिवस. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी - आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी - तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील, तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. काळजी करण्याचा दिवस तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी - तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार.
advertisement
6/13
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. तुमची कलात्मक आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकवणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी - आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी - तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाला मनःशांती मिळवून देतील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
13/13
टीपः हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणारे सर्वसामान्य राशिभविष्य आहे. अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या ज्योतिषांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा, प्रतिष्ठा, प्रेम की संकट, तुमच्यासाठी सोमवार कसा? मेष ते मीन आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल