TRENDING:

Car insurance : फक्त स्वस्त नाही, ‘योग्य’ पॉलिसी निवडा; कार इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Last Updated:
चुकीची पॉलिसी निवडली किंवा घाईत निर्णय घेतला तर हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे कार खरेदी इतकंच कार इन्शुरन्स निवडणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
1/8
फक्त स्वस्त नाही, ‘योग्य’ पॉलिसी निवडा; कार इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टी लक्षात
खरं तर आजच्या काळात कार खरेदी करणं म्हणजे केवळ वाहन घेणं नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असतो. गाडीचा मॉडेल, फीचर्स, कलर या गोष्टी लोक अतिशय काळजीपूर्वक निवडतात. पण याच वेळी एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते. ती म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी. चुकीची पॉलिसी निवडली किंवा घाईत निर्णय घेतला तर हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे कार खरेदीइतकंच कार इन्शुरन्स निवडणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
2/8
अनेक डीलर कारसोबत इन्शुरन्स ‘पॅकेज डील’ म्हणून देतात. त्यामुळे ग्राहकांना वाटतं की हे अनिवार्य आहे. पण IRDAI च्या नियमांनुसार तुम्ही कोणत्याही कंपनीकडून, आपल्या पसंतीचा इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकता. डीलरकडून घेतलेल्या पॉलिसीत कमी पर्याय, जास्त प्रीमियम आणि कमिशनचा खर्चही जोडलेला असतो.
advertisement
3/8
याउलट, ऑनलाइन इन्शुरन्स घेतल्यास तुम्ही विविध कंपन्यांचे प्लॅन, कव्हरेज, अॅड-ऑन आणि प्रीमियमची तुलना करून योग्य पॉलिसी निवडू शकता. उदाहरणार्थ डीलर 25 हजार रुपयांचा प्लॅन देत असेल तर तोच प्लॅन ऑनलाइन 18 हजारांमध्ये मिळू शकतो, म्हणजे थेट 7 हजार रुपयांची बचत.
advertisement
4/8
स्वतः इन्शुरन्स घेतल्याचे फायदेजर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पॉलिसी घेतली तर…जीरो डेप्रिसिएशन, रिटर्न टू इनव्हॉइस, रोडसाइड असिस्टन्स, इंजिन प्रोटेक्शन यांसारखे आवश्यक अॅड-ऑन स्वतःच्या गरजेनुसार निवडू शकता. ऑनलाइन प्रक्रियेत कमिशन लागत नाही आणि सर्वकाही पारदर्शक राहतं.
advertisement
5/8
लाँग-टर्म प्लॅन अधिक फायदेशीरबहुतेक ग्राहक एक वर्षाचा इन्शुरन्स घेतात आणि दर वर्षी नूतनीकरण करतात. पण हे त्रासदायक ठरू शकतं.त्यापेक्षा 3 वर्षांचा लाँग-टर्म प्लॅन पैसे वाचवतो आणि रिन्यूअलची चिंता दूर करतो.
advertisement
6/8
उदाहरणार्थ1 वर्षाची पॉलिसी = 18,000 रुपये3 वर्षांची पॉलिसी = 48,000 रुपयेयामुळे एकूण 6,000 रुपयांची बचत होते.थर्ड पार्टी विरुद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सभारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. हे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीची भरपाई करते. पण तुमच्या स्वतःच्या कारचं नुकसान मात्र यात कव्हर होत नाही.
advertisement
7/8
त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी सर्वोत्तम यात तुम्हाला मिळतं थर्ड पार्टी कव्हर, स्वतःच्या कारचं नुकसान, चोरी, आग लागल्यासारख्या गोष्टी कव्हर होतात.
advertisement
8/8
पूर आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण, फक्त स्वस्त बघून पॉलिसी निवडू नका. केवळ काही हजार वाचवण्यासाठी लोक थर्ड पार्टी पॉलिसी घेतात. पण जर नवीन कारचं अपघातात मोठं नुकसान झालं, तर संपूर्ण खर्च तुमच्याच खिशातून जाईल.थोडा अधिक प्रीमियम देऊन कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेणं नेहमीच स्मार्ट निर्णय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car insurance : फक्त स्वस्त नाही, ‘योग्य’ पॉलिसी निवडा; कार इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल