TRENDING:

IIT च्या इंजीनिअरची कमाल, विना ड्रायव्हर चालते ही कार, टारझन दी वंडर कारसारख्या सुविधा, तुम्हीही व्हाल चकित...

Last Updated:
सध्या भोपाळच्या रस्त्यावर एक अनोखी गाडी पाहायला मिळत आहे. ही फुली ऑटोमॅटिक गाडी आहे. ही गाडी दिसायला बुलेरोसारखी आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे हिला चालवण्यासाठी कोणत्याही चालकाची म्हणजे ड्रायव्हरची आवश्यकता नाही. नेमकी या गाडीची आणखी विशेषत: काय आहे, ही कुणी तयार केली, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. (रितिका तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/8
photos : विना ड्रायव्हर चालते ही कार, टारझन दी वंडर कारसारख्या सुविधा, तुम्ही...
भोपाळ येथील रहिवासी आणि इलेक्ट्रॉनिक अभियंता संजीव शर्मा यांनी तब्बल 8 वर्षांच्या मेहनतीनंतर हे वाहन तयार केले आहे.
advertisement
2/8
संजीव यांनी आयआयटी रुरकी येथून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. संजीव यांनी सुमारे 50 हजार किलोमीटरपर्यंत ड्रायव्हरशिवाय या वाहनाची ट्रायल रन पूर्ण केली आहे.
advertisement
3/8
ही कार चालवण्यासाठी तुम्हाला फक्त ती सुरू करावी लागेल. त्यानंतर ती आपला मार्ग स्वत:च ठरवते.
advertisement
4/8
या कारमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समोरून येणारे वाहन आणि व्यक्ती पाहून आपोआप आपला मार्ग बदलते.
advertisement
5/8
विना ड्रायवर चालणारी ही कार भोपाळच्या कोलार रोडवर चालताना दिसली. सध्या तिची ट्रायल रन सुरू आहे. आतापर्यंत या कारने 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
advertisement
6/8
रोबोटिक तंत्रज्ञानाने ही कार तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तिला चालवण्यासाठी चालकाची गरज नाही.
advertisement
7/8
लांबच्या प्रवासासाठी हे वाहन खूप फायदेशीर ठरू शकते. एकदा सुरू केल्यावर आपोआप ही कार चालू लागते.
advertisement
8/8
आपोआप ही कार समोरून येणाऱ्या वाहनालाही साईड देते आणि तेथून जाणाऱ्या लोकांचीही काळजी घेते. त्यामुळे येणाऱ्या काळात ही कार एक मोठी उपलब्धी असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
IIT च्या इंजीनिअरची कमाल, विना ड्रायव्हर चालते ही कार, टारझन दी वंडर कारसारख्या सुविधा, तुम्हीही व्हाल चकित...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल