TRENDING:

Kia मोटर्सचा मोठा धमाका, अखेर भारतात आणली हायटेक Seltos, लूक पाहून पडाल प्रेमात

Last Updated:
दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्स इंडियानेही आता आपली लोकप्रिय Kia Seltos 2025 लाँच केली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर Kia Seltos चा नवीन अवतार कंपनीने आणला आहे. हाय टेक डिझाइन, लेव्हल-2 ADAS सेफ्टी आणि दमदार इंजिनचा ऑप्शन दिला आहे.
advertisement
1/12
Kia मोटर्सचा मोठा धमाका, अखेर भारतात आणली हायटेक Seltos, लूक पाहून पडाल प्रेमात
भारतात गेल्या काही दिवसांपासून SUV गाड्यांचा हंगाम आला आहे. एकापेक्षा एक SUV लाँच करण्याचा कंपन्यांनी धडाका लावला आहे. दक्षिण कोरियन कंपनी किया मोटर्स इंडियानेही आता आपली लोकप्रिय Kia Seltos 2025 लाँच केली आहे. जवळपास ६ वर्षांनंतर Kia Seltos चा नवीन अवतार कंपनीने आणला आहे. आता नवीन Kia Seltos 2025 ही प्रीमियम आणि टेक्नालॉजीने सुसज्ज आहे. हाय टेक डिझाइन, लेव्हल-2 ADAS सेफ्टी आणि दमदार इंजिनचा ऑप्शन दिला आहे.
advertisement
2/12
Kia Seltos 2025 ही आधीच्या किआपेक्षा खूप मोठी आणि प्रशस्त आहे. या एसयूव्हीची लांबी ही 4,460 मिमी आणि रुंदी 1,830 मिमी आहे, जी या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी आणि लांबीची SUV आहे. लांबी जास्त असल्यामुळे Kia Seltos 2025  आरामदायक अशीच आहे. 
advertisement
3/12
Kia Seltos 2025 चा बंपर हा  Digital Tiger Face ग्रिल, ब्लॅक हाय-ग्लॉसी फिनिश आणि डार्क गनमेटल एक्सेंटमुळे आणखी प्रीमियम असा लूक देतोय. Kia Seltos 2025 मध्ये आईस क्युब LED हेडलॅम्प्स आणि स्टार मॅप LED DRLs दिले आहे, त्यामुळे रात्रीच्या प्रवासात ही एसयूव्ही उत्तम अशी दृश्यमानता देईल. सोबतच मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेललॅप्स दिले आहे.
advertisement
4/12
Kia Seltos 2025 मध्ये 18-इंचाचे क्रिस्टल कट अलॉय व्हिल्स दिले आहेत. जे नियॉन ब्रेक कॅलिपर्ससह येतात. सोबतच इंटिग्रेटेड रिअर स्पॉयलर, हिडन रिअर वायपर आणि ऑटोमॅटिक फ्लश डोर हॅडल्स सारखे फिचर्स दिले आहेत.
advertisement
5/12
Kia Seltos 2025 मध्ये तब्बल १० रंगाचा मोनो टोन पर्याय दिला आहे.  यामध्ये दोन नवीन रंग ‘Morning Haze’आणि ‘Magma Red’ चा समावेश आहे, जे पहिल्यांदाच Kia इंडियाने भारतात आणला आहे.   Kia Seltos 2025 च्या इंटिरियरबद्दल बोलायचं झालं तर केबिन एकदम फ्रेश आणि प्रीमियम अशीच आहे,  स्मोकी ब्लॅक आणि व्हाइट टू-टोन इंटीरिअर, व्हाइट एक्सेंट आणि लेदरेट सीट्स दिले आहेत. डॅशबोर्डवर 30 इंचाचा एका मोठा ट्रिनिटी पॅनोरमिक डिस्प्ले दिला आहे. तसंच स्टेअरिंग व्हिल सुद्धा आकर्षक आणि स्पोर्टी लूक दिसेल असंच आहे. 
advertisement
6/12
Kia Seltos 2025 मध्ये  ड्रायव्हरचे सीट पॉवर अॅडजस्टमेंटसह येतंय. ज्यामध्ये लंबर सपोर्ट आणि रीलॅक्स फंक्शन दिलं आहे. एवढंच नाहीतर सीट हे ORVM सेटिंगशी जोडलेले आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान ड्रायव्हरची जागा ही आपोआप चांगली होईल.  Kia Seltos 2025 मध्ये  Bose चे 8-स्पिकर साउंड सिस्टम दिली आहे. सोबतच  64-कलर एम्बिएंट लायटिंग दिली आहे, ज्यामुळे केबिनचा मूड चांगला होईल. यासोबत वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पॅनोरमिक सनरूफ आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्लायन एडजस्टमेंट, सनशेड कर्टन आणि टाइप-C चार्जिंग पोर्ट्स दिले आहे. 
advertisement
7/12
Kia Seltos 2025 मध्ये स्मार्ट की प्रॉक्सिमिटी अनलॉक फिचर्स दिलं आहे, ज्यामुळे चावी नसेल तरी कार अनलॉक करता येईल. वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सारखे कनेक्टिविटी फिचर्सही दिले आहे.  
advertisement
8/12
Kia Seltos 2025  ही किया च्या नव्या ग्लोबल K3 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. हाय-टेंसाइल स्टिल आणि मजबूत स्ट्रक्चरवर ही तयार केली आहे.  Kia Seltos 2025  मध्ये 24 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स दिले आहे. यामध्ये  6 एअरबॅग, ABS, ESC, हिल स्टार्ट असिस्ट आणि रिअर ऑक्युपेंट अलर्ट दिला आहे.
advertisement
9/12
Kia Seltos 2025 मध्ये 3 इंजिनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय असणार आहे. ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकसह पर्याय आहे.
advertisement
10/12
Kia Seltos 2025 मध्ये स्टँडर्ड ट्रिमसह HTE, HTK, HTX आणि GTX असे ट्रिम दिले आहे.सोबतच एक खास X-Line हा व्हेरियंटही उपलब्ध आहे. सोबतच Convenience, Premium आणि ADAS पॅकेजसह ग्राहक हे Kia Seltos 2025 आपल्या गरजेनुसार SUV ला कस्टमाईज करू शकतात.
advertisement
11/12
लेव्हल-2 ADAS सह 21 सेफ्टी फिचर्स दिले आहे. ज्यामध्ये फॉरवर्ड कोलिजन वार्निंग, लेन किप असिस्ट आणि स्मार्ट क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे. 
advertisement
12/12
किया मोटर्सने अद्याप Kia Seltos 2025 ची किंमत जाहीर केली नाही.  ११ डिसेंबरच्या रात्रीपासून प्री बुकिंग सुरू झालं आहे.  २५ हजार रुपयांमध्ये Kia Seltos 2025 चं प्री बुकिंग करता येणार आहे. २ जानेवारी २०२६ रोजी या एसयूव्हीच्या किंमतीबद्दल घोषणा करण्यात येईल आणि एसयूव्हीची डिलेव्हरी फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात होईल. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Kia मोटर्सचा मोठा धमाका, अखेर भारतात आणली हायटेक Seltos, लूक पाहून पडाल प्रेमात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल