TRENDING:

Kinetic: 500 रुपयांमध्ये बूक करा अन् मुलांना शाळेत सोडा की दुकानातून काहीही आणा, 200 किमीपर्यंत नो टेन्शन!

Last Updated:
जर पेट्रोल संपलं तर तुम्ही पेंडल मारून ही बाइक घरी आणू शकत होता. त्यावेळचा तो काळ तिचाच होता. पण काळाच्या पडद्याआड ती नाहीशी झाली. पण आता ईलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुन्हा आली आहे.
advertisement
1/7
Kinetic: 500 रुपयांमध्ये बूक करा अन् मुलांना शाळेत सोडा की दुकानातून काहीही आणा
1990 च्या काळात जेव्हा स्कुटर नव्हती तेव्हा लुना हे नाव प्रत्येक घराघरात माहित होतं. छोटसं इंजिन, पेट्रोल टाकी अन् पेंडल असलेली अशीही लुना. जर पेट्रोल संपलं तर तुम्ही पेंडल मारून ही बाइक घरी आणू शकत होता. त्यावेळचा तो काळ तिचाच होता. पण काळाच्या पडद्याआड ती नाहीशी झाली. पण आता ईलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुन्हा आली आहे.
advertisement
2/7
काही दिवसांपूर्वी कायनेटिकने ई लुना लाँच केली होती. आता तिचं नवी मॉडेल आणत आहे. या ऑटोमेकरने इलेक्ट्रिक मोपेडच्या आगामी अपडेटेड मॉडेलसाठी डिझाइन पेटंट नोंदणीकृत केलं आहे. कायनेटिक लूना ही देशातील सर्वात लोकप्रिय मोपेडपैकी एक आहे, जी अनेक रायडर्सना तसंच दुकानदारांना साहित्य नेण्यासाठी मदत करते.
advertisement
3/7
नवीन कायनेटिक ई-लुनाच्या पेटंटवरून असे दिसून येते की, इलेक्ट्रिक मोपेड पेट्रोल मॉडेलसारखे दिसणारे डिझाइनसह येईल.पण इलेक्ट्रिक मॉडेलनुसार डिझाइनमध्ये काही बदल होतील. नवीन कायनेटिक ई-लुनामध्ये चौकोनी हेडलॅम्प आणि एक लहान टॅबसारखे पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
advertisement
4/7
ई-लुनामध्ये बॅटरी पॅक कुठे ठेवला जाईल हे सध्या स्पष्ट नाही, परंतु रायडरच्या सीट आणि हँडलबारमध्ये एक मोठा बॉक्स दिसला आहे. त्या बॉक्समध्ये एक नवीन बॅटरी पॅक असू शकतो, ज्यामुळे इलेक्ट्रिक मोपेडची रायडिंग रेंज वाढेल. तसंच कायनेटिकने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. येणारी ई-लुना सध्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ई-लुनासारखीच दिसते.
advertisement
5/7
सध्याच्या कायनेटिक ई-लुनामध्ये २ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे. जी एकदा चार्जवर ११० किमी पर्यंतची रेंज देते. नवीन मॉडेलमध्ये अतिरिक्त बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
अपडेटेड कायनेटिक ई-लुना एकदा पूर्ण चार्ज केल्यावर २०० किलोमीटरपर्यंत धावेल. सध्याचे मॉडेल जास्तीत जास्त ५० किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतात.
advertisement
7/7
कायनेटिकने नवीन ई-लुना साठी कोणतीही लाँच योजना जाहीर केलेली नाही. पण या वर्षी सणासुदीच्या सुमारास ती बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Kinetic: 500 रुपयांमध्ये बूक करा अन् मुलांना शाळेत सोडा की दुकानातून काहीही आणा, 200 किमीपर्यंत नो टेन्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल