TRENDING:

Maruti आता मार्केटमध्ये करणार कब्जा, पहिली EV SUV सज्ज, रेंज 500 किमी, किंमत...

Last Updated:
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये मागील अनेक वर्षांपासून ईलेक्ट्रिक वाहन उत्पादनामध्ये टाटा आणि महिंद्राने जोरदार आघाडी घेतली आहे. आता या रांगेत मध्यवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे.
advertisement
1/9
Maruti आता मार्केटमध्ये करणार कब्जा, पहिली EV SUV सज्ज, रेंज 500 किमी, किंमत...
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये मागील अनेक वर्षांपासून ईलेक्ट्रिक वाहन उत्पादनामध्ये टाटा आणि महिंद्राने जोरदार आघाडी घेतली आहे. टाटा आणि महिंद्राने एकापेक्षा एक ईलेक्ट्रिक कार लाँच करून धडाका लावला आहे. सेडान कारपासून ते एसयूव्हीपर्यंत दोन्ही कंपन्यांनी दमदार असे मॉडेल लाँच केले आहे. आता या रांगेत मध्यवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आपली पहिली वहिली ई विटारा ( e Vitara) चं उत्पादन सुरू केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते e Vitara ला हिरवा झेंडा दाखवला आहे.
advertisement
2/9
मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक e Vitara ची मागील ८ महिन्यांपासून चर्चा होती. ही e Vitara कधी लाँच होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण अखेरीस गुजरातमधील मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये e Vitara च्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. मारुती सुझुकीची ही पहिली वहिली इलेक्ट्रिक कार आहे.
advertisement
3/9
ई- ग्रँड विटारा ही एसयुव्हीचं उत्पादन सुरू झालं आहे. भारतातील काही भागांमध्ये या कारची चाचणीही सुरू आहे. जानेवारी 2025 मध्ये महिन्यात मारुती सुझुकीने ई- ग्रँड विटारावरून परदा बाजूला केला होता. या कारच बुकिंगही 25,000 रुपये देऊन पार पडलं. आता या कारची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.
advertisement
4/9
e Vitara मध्ये दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येणार आहे. ६१.१kWh आणि ४८.८kWh. एकाच इलेक्ट्रिक मोटरसह दोन्ही पर्याय एकाच चार्जवर ५०० किमीची रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय, डीसी फास्ट चार्जरद्वारे बॅटरी ५० मिनिटांत शून्य ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.
advertisement
5/9
एवढंच नाहीतर  स्प्लेंडिड सिल्वर, ऑपुलेंट रेड, आर्कटिक व्हाइट आणि लँड ब्रीज ग्रीन ड्यूल-टोन कलर सुद्धा दिले जाईल.  भारतात e Vitara चा सामना हा  हुंदईच्या क्रेटा इलेक्ट्रिकशी होणार आहे.
advertisement
6/9
e Vitara 2025 मध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ, एडीएएस सूट, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस मोबाइल चार्जर, ड्राइव्ह मोड, सात एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल १०-इंच स्क्रीन, १८-इंच अलॉय व्हील्स, फॉग लाईट्स आणि थ्री-पॉइंट एलईडी डीआरएल आणि टेललाईट्स यांचा समावेश असेल.
advertisement
7/9
ग्राहकांना बॅटरी चॉईस करण्यासाठी पर्याय मिळणार आहे.   e Vitara चं उत्पादन हे  गुजरात प्लांटमध्ये होणार आहे. तिथून जपान आणि युरोपला निर्यात होणार आहे.  या एसयुव्हीला नेक्सा आउटलेट्सकडून विक्री होणार आहे.
advertisement
8/9
नवीन  eVitara मध्ये सेफ्टीसाठी 7 एअरबॅग दिले जाणार आहे. तसंच 360-डिग्री कॅमरे,लेव्हल-2 ADAS, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह  EBD ची फिचर्सही दिलं आहे. यात  R18 एअरोडायनामिक अलॉय व्हील्स दिले आहे, यामध्ये  समोर 3-पॉइंट मॅट्रिक्स LED DRL आणि मागे लॅम्प दिला आहे.  या एसयुव्हीचा 180mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. शिवाय या एसयुव्हीची लांबी 4,275mm, रुंदी 1,800mm, उंची 1,635mm आणि व्हिलबेस 2,700mm दिला आहे.
advertisement
9/9
e Vitara 2025 च्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप या कारची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. e Vitara 2025 ची किंमत पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर केली जाईल. मात्र, किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, २० लाख ते २५ लाखांच्या किंमतीमध्ये ही SUV विकत घेता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti आता मार्केटमध्ये करणार कब्जा, पहिली EV SUV सज्ज, रेंज 500 किमी, किंमत...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल