Tata ला ओपन चॅलेंज, Maruti ची नवी कोरी SUV निघाली टँकसारखी मजबूत, मिळाले 5 स्टार रेटिंग
- Published by:Sachin S
Last Updated:
अलीकडेच लाँच केलेली maruti suzuki victoris ला आता ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीची ही दुसरी कार ही ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ठरली आहे.
advertisement
1/9

भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आणखी एक धमाका केला आहे. अलीकडेच लाँच केलेली maruti suzuki victoris ला आता ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुती सुझुकीची ही दुसरी कार ही ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी ठरली आहे. या maruti suzuki victoris प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. जीएनसीएपीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार या मॉडेलची चाचणी घेण्यात आली. व्हिक्टोरिसमध्ये मानक 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि पादचाऱ्यांची सुरक्षा समावेश आहे, तर ADAS (ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम) पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
advertisement
2/9
प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये maruti suzuki victoris ने प्रौढांच्या सुरक्षेमध्ये 34 पैकी 33.72 गुण मिळवले. या कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याच्या आणि मानेच्या भागाला चांगले संरक्षण मिळते. ड्रायव्हरच्या छातीला पुरेसं संरक्षण मिळालं, तर प्रवाशाच्या छातीला चांगले संरक्षण मिळाले.
advertisement
3/9
एसयूव्हीने ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या गुडघ्यांना तसेच ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला आणि प्रवाशांना चांगलं संरक्षण दिलं. एसयूव्हीमध्ये ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला पुरेसं संरक्षण मिळालं. बॉडीशेल आणि फूटवेल क्षेत्राला जास्त भार सहन करण्यास सक्षम म्हणून रेट केलं गेलं. साइड इम्पॅक्ट सेफ्टी साइड इम्पॅक्टमध्ये, व्हिक्टोरिसने छातीला पुरेसे संरक्षण आणि डोके, पोट आणि पेल्व्हिसला चांगले संरक्षण दिले.
advertisement
4/9
साइड पोल इम्पॅक्टमध्ये सुद्धा डोके, छाती, पोट आणि पेल्व्हिसची सुरक्षा देखील चांगली रेटिंग देण्यात आली. सर्व सीटिंग पोझिशन्ससाठी सीट बेल्ट रिमाइंडर्स (SBRs) जागतिक NCAP मानकांची पूर्तता करतात. SUV ची पादचाऱ्यांची सुरक्षा देखील UN127 नियमांचे पालन करते. 49 पैकी 41 गुण मारुती व्हिक्टोरिस चाइल्ड सेफ्टी मुलांच्या सुरक्षेमध्ये, मारुती व्हिक्टोरिसने 49 पैकी 41 गुण मिळवले.
advertisement
5/9
डायनॅमिक टेस्टमध्ये (24 पैकी 24) आणि CRS इन्स्टॉलेशन टेस्टमध्ये (12 पैकी 12) पूर्ण गुण मिळाले. फ्रंटल इम्पॅक्टमध्ये, 18 महिन्यांच्या आणि 3 वर्षांच्या मुलांच्या डमी पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आल्या.
advertisement
6/9
आयसोफिक्स अँकर आणि सपोर्ट लेग्स वापरून डमीला पुढच्या प्रवासी सीटवर मागील बाजूस असलेल्या चाइल्ड सीट पोझिशनमध्ये सुरक्षित करण्यात आले.
advertisement
7/9
विशेष म्हणजे, या SUV ला BNCAP (Bharat New Car Assessment Programme) मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, असा दावा केला आहे.
advertisement
8/9
SUV मध्ये AWD सिस्टिम दिलं आहे जे खास करून 1.5L NA ऑटोमॅटिक व्हेंरिएटमध्ये मिळेल. ट्रान्समिशनची बाजू पाहिली तर एसयूव्हीमध्ये 5-स्पीड मॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आणि e-CVT हे हायब्रिडसाठी गिअरबॉक्स दिला आहे. एवढंच नाहीतर या SUV मध्ये ADAS Level 2 टेक्नोलॉजी दिली आहे.
advertisement
9/9
या एसयूव्हीची किंमत किती असेल याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवलेे जात आहे. कंपनीकडून अजूनही किंमतीची घोषणा केलेली नाही. मात्र, Victoris ची किंमत 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या Victoris ची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata ला ओपन चॅलेंज, Maruti ची नवी कोरी SUV निघाली टँकसारखी मजबूत, मिळाले 5 स्टार रेटिंग