TRENDING:

Maruti Victoris: मारुती फक्त नावचं पुरे! 5 स्टार सेफ्टी अन् मायलेजही 28 किमी, नव्या SUV ने सगळ्यांची उडवली झोप

Last Updated:
Maruti Victoris असं या SUV चं नाव आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही एक पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी सेगमेंटमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे.
advertisement
1/8
Maruti Victoris: मारुती फक्त नावचं पुरे! 5 स्टार सेफ्टी अन् मायलेजही 28 किमी
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Maruti Suzuki पुन्हा एकदा एक दमदार अशी SUV लाँच केली आहे. Maruti Victoris असं या SUV चं नाव आहे. विशेष म्हणजे, ही एसयूव्ही एक पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी सेगमेंटमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एसयूव्ही एक हायब्रिड आहे. यामध्ये माईल्ड हायब्रिड आणि स्ट्र्राँग हायब्रिड ऑप्शन दिला आहे. त्यामुळे मायलेजमध्ये ही एसयूव्ही किंग ठरणार आहे.
advertisement
2/8
मारुती सुझुकीने आपल्या Arena च्या छताखाली Victoris SUV आणली आहे. मारुती सुझुकीची ही पाचवी SUV आहे. या एसयूव्हीचं नाव  Maruti Victoris असं ठेवण्यात आलं आहे. ही एसयूव्ही वेगवेगळ्या 6 ट्रीम व्हेरियंटमध्ये ही SUV उपलब्ध असणार आहे.
advertisement
3/8
मारुती सुझुकीने आज बुधवारी Victoris चं दमदार लाँचिंग केलं आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनीने या SUV ला BNCAP (Bharat New Car Assessment Programme) मध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, असा दावा केला आहे.
advertisement
4/8
SUV मध्ये AWD सिस्टिम दिलं आहे जे खास करून 1.5L NA ऑटोमॅटिक व्हेंरिएटमध्ये मिळेल.  ट्रान्समिशनची बाजू पाहिली तर एसयूव्हीमध्ये 5-स्पीड मॅनुअल, 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक आणि e-CVT हे हायब्रिडसाठी गिअरबॉक्स दिला आहे. एवढंच नाहीतर  या SUV मध्ये  ADAS Level 2 टेक्नोलॉजी दिली आहे.
advertisement
5/8
Maruti Suzuki Victoris मध्ये  वेगवेगळ्या पावरट्रेनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे.  पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे.
advertisement
6/8
Maruti Victoris मध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये इंधन क्षमता ही ४५ लिटर इतकी आहे. कंपनीने दावा केला आहे की, पेट्रोल व्हेरियंट हे २१ किमी मायलेज देईल. Maruti Victoris मध्ये सीएनजीचा ही पर्याय दिला आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये २७ किमी मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
7/8
Maruti Victoris मध्ये आता माईल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड दिलं आहे. स्ट्राँग हायब्रिडमध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही गाडी तब्बल २८.६५ किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. या सेगमेंटमध्ये ही रेंज सर्वाधिक असल्याचं मानलं जात आहे.
advertisement
8/8
Victoris आल्यामुळे मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. या एसयूव्हीची किंमत किती असेल याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवलेे जात आहे. कंपनीकडून अजूनही किंमतीची घोषणा केलेली नाही. मात्र, Victoris ची किंमत 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत असणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या Victoris ची बुकिंग लवकरच सुरू होणार आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti Victoris: मारुती फक्त नावचं पुरे! 5 स्टार सेफ्टी अन् मायलेजही 28 किमी, नव्या SUV ने सगळ्यांची उडवली झोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल