TRENDING:

Keeway RR300: विषयच वेगळा! भारतात लाँच झाली hayabusa सारखी दिसणारी बाइक, किंमतही कमी

Last Updated:
आता  भारतात अधिकृतपणे Keeway ब्रँडची विक्री करणाऱ्या Moto Vault ने RR300 लाँच केली आहे. स्पोर्टी लूक आणि कमी किंमतीमुळे ही बाइक अनेक स्पोर्ट बाइकला टक्कर देत आहे. 
advertisement
1/7
विषयच वेगळा! भारतात लाँच झाली hayabusa सारखी दिसणारी बाइक, किंमतही कमी
भारतात सध्या अनेक दुचाकींचा बोलबाला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्पोर्ट बाइक सेगमेंटमध्ये यामाहा, सुझुकी, हिरो, होंडा, बजाज आणि टीव्हीएसने दबदबा निर्माण केला आहे. आता  भारतात अधिकृतपणे Keeway कीवे ब्रँडची विक्री करणाऱ्या Moto Vault ने RR300 लाँच केली आहे. स्पोर्टी लूक आणि कमी किंमतीमुळे ही बाइक अनेक स्पोर्ट बाइकला टक्कर देत आहे. 
advertisement
2/7
Keeway RR300 ची किंमत 1.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. या मोटरसायकलची डिझाइन आक्रमक आहे आणि ती भारतात पूर्वी विकल्या गेलेल्या कीवे K300 R च्या रिब्रँडेड सारखी दिसते. २०२५ च्या कीवे RR300 मध्ये पूर्ण फेअरिंग आहे आणि बूमरँग-शैलीतील DRL, मस्क्युलर टँक आणि हाय टेल सेक्शनचे तिला स्पोर्टी लूक देते.
advertisement
3/7
ही बाइक ३ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: पांढरा, काळा आणि लाल. नवीन कीवे RR300 साठी बुकिंग सर्व Benelli आणि Keeway डीलरशिपवर खुली आहे आणि डिलिव्हरी जुलैच्या अखेरीस सुरू होईल.
advertisement
4/7
ही बाइक प्रामुख्याने TVS Apache RR 310, BMW G 310 RR आणि KTM RC390 शी स्पर्धा करेल. Keeway RR300 मध्ये ट्रेलिस फ्रेम आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला USD फोर्क्स आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेंशन आहे.
advertisement
5/7
292cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड - Keeway RR300 मध्ये इंजिन नवीन आहे जे 292cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. 27.5bhp आणि 25Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे ज्यामध्ये स्लिपर क्लच आहे.
advertisement
6/7
Keeway चा दावा आहे की त्याचा टॉप स्पीड 139kmph आहे, तर एक्सेलेरेशनचे आकडे उपलब्ध नाहीत. बाइकच्या दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आहेत, ते 17-इंच व्हिल दिले आहे आणि 110/70R17 फ्रंट आणि 140/60R17 रियर टायर्स आहे. याशिवाय, एक इन्स्ट्रुमेंटेशन TFT क्लस्टर आहे आणि बाइकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS आहे.
advertisement
7/7
अपडेटेड RTR 310 सोबत स्पर्धा - TVS ने अपडेटेड RTR 310 लाँच केली आहे, जे मुळात RR 310 ची एक न्यूड बाइक आहे, जी Keeway RR300 शी थेट स्पर्धा करते. बाइकमध्ये अनेक किरकोळ अपडेट्स आहे. अपडेटेड RTR 310 च्या किमती ₹ 2.39 लाखांपासून सुरू होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Keeway RR300: विषयच वेगळा! भारतात लाँच झाली hayabusa सारखी दिसणारी बाइक, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल