TRENDING:

Pune: खोपोलीच्या घाटात 100 ते 200 गाड्या एकाच जागी उभ्या राहण्याचं खरं कारण समोर, तुमच्यासोबतही असं होऊ शकतं!

Last Updated:
पावसाळ्याचे मस्त दिवस असल्यामुळे साहजिक कारचा प्रवास हा आल्हादायक असाच असतो. पण, जेव्हा लोणावळा-खंडाळा घाटात पोहोचले तेव्हा अनेक गाड्या बंद पडल्याचं पाहण्यास मिळालं.
advertisement
1/7
Pune: खोपोलीच्या घाटात 100 ते 200 गाड्या एकाच जागी उभ्या राहण्याचं खरं कारण समोर
15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाला लागून शनिवार आणि रविवार आल्यामुळे सलग ३ सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील चाकरमानी मुंबईच्या बाहेर सुट्टी एन्जॉय कराला निघाले आहे. पावसाळ्याचे मस्त दिवस असल्यामुळे साहजिक कारचा प्रवास हा आल्हादायक असाच असतो. पण, जेव्हा लोणावळा-खंडाळा घाटात पोहोचले तेव्हा वाहतूक कोंडीने रास्ता रोको केला. एवढंच नाहीतर घाटामध्ये कार सारखी चालू ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न हा 100 ते २०० कारचालकांच्या अंगाशी आला आहे. घाटामध्ये एकाच वेळी अनेक गाड्या या जागेवरच थांबल्या होत्या.
advertisement
2/7
जुन्या खोपोली घाटात अचानक १०० ते २०० गाड्या रस्त्यात बंद पडल्या आहेत. या सर्व गाड्या घाटात रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारे एकाच वेळी १०० ते २०० गाड्या बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या सर्व गाड्यांचे क्लच प्लेट जळाल्या असल्याची माहिती समोर आली.
advertisement
3/7
पण घाटात किंवा चढणीवर कारची क्लच प्लेट खराब होण्याची काही प्रमुख कारणं आहेत. क्लचवर जास्त ताण (Riding the Clutch) जेव्हा तुम्ही चढणीवर गाडी पुढे नेण्यासाठी किंवा गाडी जागच्या जागी थांबवण्यासाठी क्लच पेडलचा जास्त वेळ वापर करता, तेव्हा क्लच प्लेट आणि फ्लाईव्हील यांच्यात घर्षण (friction) होतं. याला 'क्लच रायडिंग' (clutch riding) म्हणतात. या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते आणि क्लच प्लेट लवकर खराब होते.
advertisement
4/7
जास्त भार (Overloading) जर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त सामान असेल किंवा जास्त प्रवासी असतील, तर इंजिनला गाडी पुढे ढकलण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. यामुळे क्लच प्लेटवर अधिक दबाव येतो आणि ती लवकर घासून खराब होते.
advertisement
5/7
आरपीएम (Insufficient RPM) कमी - चढणीवर गाडी सुरू करताना किंवा पुढे नेताना जर तुम्ही योग्य प्रमाणात रेव्ह (revs) दिले नाहीत, तर गाडी मागे सरकते किंवा बंद पडते. यामुळे गाडीला पुढे ढकलण्यासाठी क्लचवर जास्त ताण येतो. अनेकदा ड्रायव्हर्स गाडी मागे जाऊ नये म्हणून क्लचचा वापर करतात, ज्यामुळे क्लच प्लेट जास्त घासली जाते.
advertisement
6/7
चुकीच्या गिअरचा वापर (Wrong Gear Selection)- चढणीवर गाडी चालवताना योग्य गिअर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कमी वेगात जास्त गिअरमध्ये (उदाहरणार्थ, दुसऱ्या गिअरमध्ये जाण्याऐवजी तिसऱ्या गिअरमध्ये) गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तर इंजिन आणि क्लचवर अनावश्यक ताण येतो. यामुळे क्लच प्लेटची झीज लवकर होते.
advertisement
7/7
त्यामुळे घाटामध्ये गाडी चालवताना क्लचचा वापर योग्य पद्धतीने करणं आणि गाडीवर जास्त भार न टाकणं आवश्यक आहे. नेहमी हँडब्रेकचा वापर करून गाडी थांबावी आणि पुढे जाण्यासाठी योग्य गिअर आणि आरपीएमचा वापर करावा, जेणेकरून क्लच प्लेटचं आयुष्य वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Pune: खोपोलीच्या घाटात 100 ते 200 गाड्या एकाच जागी उभ्या राहण्याचं खरं कारण समोर, तुमच्यासोबतही असं होऊ शकतं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल