वर्षाच्या अखेरीस या 4 गाड्यांवर मिळतोय 2.50 लाखांचं डिस्काउंट! पाहा किंमत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Stock Clearance Discount: नवीन वर्षाच्या आधी कंपन्या बाहेर पडणाऱ्या मॉडेल्सचा स्टॉक क्लिअर करण्यात व्यस्त आहेत. परिणामी, वाहनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलं जातंय. चला डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
advertisement
1/5

2026 च्या आधी ऑटोमोबाईल मार्केटमध्ये उत्साह आहे. कंपन्या जुन्या मॉडेल्सचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी देखील काम करत आहेत. ग्राहकांना याचा थेट फायदा होतोय. कारण या वाहनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलं जातंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही प्रतीक्षा कालावधी नाही. कोणत्या एसयूव्हीवर किती डिस्काउंट उपलब्ध आहे ते जाणून घेऊया.
advertisement
2/5
Skoda Kushaq : स्कोडा कुशाकची फेसलिफ्ट व्हर्जन जानेवारी 2026 मध्ये भारतात लाँच केली जाऊ शकते. त्यापूर्वी, कंपनी सध्याच्या मॉडेलवर शानदार डिस्काउंट देत आहे. कुशाकवर ₹2.50 लाखांपर्यंतची डिस्काउंट दिलं जातंय. तर स्कोडा ₹3.25 लाखांपर्यंतची डिस्काउंट देण्याचा दावा करत आहे. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत ₹10.61 लाखांपासून सुरू होते.
advertisement
3/5
Mahindra XUV700 : महिंद्रा ने XUV700 च्या फेसलिफ्ट व्हर्जनलला टीझ केलंय. हे वाहन 5 जानेवारी 2026 रोजी XUV 7XO या नावाने लाँच केले जाईल. याआधी, बाहेर पडणाऱ्या XUV700 ला डीलर स्तरावर अंदाजे 80 हजार रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. महिंद्रा XUV700 ची एक्स-शोरूम किंमत ₹13.66 लाख पासून सुरू होते.
advertisement
4/5
Tata Punch : टाटा मोटर्स गेल्या काही काळापासून पंच फेसलिफ्टची टेस्टिंग करत आहे. या मायक्रो एसयूव्हीला 2026 मध्ये अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, फेसलिफ्टपूर्वी पंचला अंदाजे 80 हजार रुपयेची सूट मिळत आहे. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत ₹5.50 लाख ते ₹9.30 लाख दरम्यान आहे.
advertisement
5/5
Kia Seltos : किया 2026 मध्ये तिच्या लोकप्रिय एसयूव्ही, सेल्टोसची अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. कंपनी सध्याच्या सेल्टोसवर ₹1.60 लाखांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. किंमती ₹10.79 लाखांपासून सुरू होतात आणि ₹19.81 लाखांपर्यंत जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
वर्षाच्या अखेरीस या 4 गाड्यांवर मिळतोय 2.50 लाखांचं डिस्काउंट! पाहा किंमत