TRENDING:

Manoj Jarange Patil: 'डांबरी रस्ते से जायेंगे' मनोज जरांगेंसाठी खास TATA Harrier, ताफ्यात फॉर्च्युनर, फोर्ड सारख्या SUV, रॅलीचे खास PHOTOS

Last Updated:
मनोज जरांगे पाटील शेकडो मराठा बांधवांना गेऊन घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहे. त्यांच्यासोबत शेकडो मराठा बांधव हे टेप्पो, कार, मालवाहतूक गाड्यातून रॅलीत सामील झाले आहे. खुद्द जरांगेंसाठी खास अशी टाटा हॅरिअर ही एसयूव्ही तैनात करण्यात आली आहे
advertisement
1/9
'डांबरी रस्ते से जायेंगे' जरांगेंसाठी खास TATA Harrier,ताफ्यात फॉर्च्युनरही PHOT
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे पाटील शेकडो मराठा बांधवांना गेऊन घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहे. त्यांच्यासोबत शेकडो मराठा बांधव हे टेप्पो, कार, मालवाहतूक गाड्यातून रॅलीत सामील झाले आहे. खुद्द जरांगेंसाठी खास अशी टाटा हॅरिअर ही एसयूव्ही तैनात करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ताफ्यात फोर्ड, फॉर्च्युनर अशा एसयूव्ही सामील आहे.
advertisement
2/9
ठरल्याप्रमाणे मनोज जरांगे हे बुधवारी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी या आपल्या गावातून निघाले. त्यांच्या ताफ्यामध्ये अनेक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
3/9
मनोज जरांगे यांच्या ताफ्यामध्ये एका ओपन ट्रकवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. या ट्रकवर माईक सिस्टिमही लावण्यात आली आहे.
advertisement
4/9
मनोज जरांगे यांच्यासाठी TATA Harrier SUV सज्ज करण्यात आली आहे. मागील आंदोलनाच्या वेळी वेगळी गाडी होती. पण यावेळी छत्रपती संभाजीनगर पासिंग असलेली गाडी वापरली आहे.
advertisement
5/9
मनोज जरांगे यांच्या ताफ्यामध्ये इतरही सदस्य २४ तास सोबत असणार आहे. त्यांच्यासाठी फॉर्च्युनर, फोर्ड आणि इतर एसयूव्ही गाड्या दिसत आहे.
advertisement
6/9
मनोज जरांगे यांचा ताफा जेव्हा अंतरवाली सराटी गावातून बाहेर पडला तेव्हा मराठा आंदोलकांनी एकच गर्दी केली होती. ठिकठिकाणी जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे.
advertisement
7/9
शेकडो मराठा बांधव जरांगे यांच्यासोबत रॅलीमध्ये सामील झाले आहे. रस्त्यावर तुफान अशी गर्दी झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनं आणि मराठा समर्थकांची एकच गर्दी झाली आहे. अशातच या रुग्णवाहिका याच रस्त्यावरून आली. पण, अवघ्या काही सेकंदात गर्दी बाजूला झाली आणि रुग्णवाहिका आली तशी सुसाट निघून गेली.
advertisement
8/9
मनोज जरांगे एका एसयूव्हीमध्ये बसलेले आहे. त्यांच्या बाजूला मराठा आंदोलकांची तुफान गर्दी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
9/9
मनोज जरांगे यांचा ताफा गर्दीतून थोडा पुढे गेला तेव्हा नाष्टा करताना आढळून आले. कारमध्ये जरांगेंनी वृत्तपत्रावरच पिठलं आणि पराठ्याचा आस्वाद घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Manoj Jarange Patil: 'डांबरी रस्ते से जायेंगे' मनोज जरांगेंसाठी खास TATA Harrier, ताफ्यात फॉर्च्युनर, फोर्ड सारख्या SUV, रॅलीचे खास PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल