Tata करणार आता मार्केटमध्ये धमाका, आणतेय कमी किंमतीत पॉवरफुल SUV, लूकही जबरदस्त
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटा मोटर्स आता नवीन वर्षात आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Punch 2026 चं Facelift मॉडेल १३ जानेवारी 2026 रोजी लाँच करणार आहे.
advertisement
1/10

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या टाटा मोटर्स आता नवीन वर्षात आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्स आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Punch 2026 चं Facelift मॉडेल १३ जानेवारी 2026 रोजी लाँच करणार आहे.
advertisement
2/10
मागील काही दिवसांपासून या मॉडेलची चाचणी सुरू होती, अखेरीस नव्या Tata Punch 2026 वरून पडदा बाजूला होणार आहे. जुन्या Tata Punch पेक्षा नवीन टाटा पंच ही जास्त आकर्षक आणि दमदार असणार आहे. यामध्ये अनेक असे हायटेक फिचर्स दिले आहे.
advertisement
3/10
नवीन Tata Punch 2026 मध्ये कनेक्टेड एलईडी टेल लाइट्स आणि नवीन डिझाईन केलेले एलईडी फॉग लॅप्स पाहण्यास मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यामध्ये आता 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सारखे हायटेक फिचर्स मिळणार आहे.
advertisement
4/10
हे फिचर्स शक्यतो मोठ्या प्रीमियम एसयूव्हीमध्ये मिळतात. या शिवाय, कारमध्ये नवीन स्टियरिंग व्हिल, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ऑटो-डिमिंग IRVM सारखे फिचर्स मिळणार आहे.
advertisement
5/10
इंजिन बदलणार का? - नव्या Tata Punch 2026 च्या इंजिनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये आता 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय सुद्धा मिळणार आहे. जे 118 BHP ची पॉवर आणि 170 Nm इतका टॉर्क जनरेट करू शकतो.
advertisement
6/10
हेच इंजिन आधी tata altroz मध्ये वापण्यात आलं आहं. हे एक पॉवरफुल इंजिन आहे. ज्या ग्राहकांना कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये दमदार इंजिन पाहिजे त्यांच्यासाठी ही एसयूव्ही आता बेस्ट पर्याय असणार आहे.
advertisement
7/10
नव्या Tata Punch 2026 मध्ये वेगवेगळे ६ व्हेरिएंट्स मिळणार आहे. यामध्ये Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished, Accomplished+ यांचा समावेश आहे.
advertisement
8/10
कंपनीने ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊन हे व्हेरियंट्स तयार केले आहे. सध्याच्या टाटा पंचच्या किंमतीपेक्षा नव्या टाटा पंचची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातं की नव्या टाटा पंचची किंमतही एक्स शोरूम 6 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
advertisement
9/10
Tata Punch Facelift चा मार्केटमध्ये थेट सामना हा Hyundai Exter, Maruti Suzuki Ignis, Renault Kiger आणि Nissan Magnite सारख्या एसयूव्हीशी होणार आहे.
advertisement
10/10
आपल्या नव्या लूक अॅडवास्ड फिचर्स आणि पॉवरफुल टर्बो इंजिनच्या मदतीने आता टाटा मोटर्स मार्केटमध्ये दुसऱ्या वाहन उत्पादक कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata करणार आता मार्केटमध्ये धमाका, आणतेय कमी किंमतीत पॉवरफुल SUV, लूकही जबरदस्त