Creta चं मार्केट होणार जाम, टाटाने टाकला मोठा डाव; Tata sierra ची किंमत इतकी कमी, सेफ्टीमध्येही किंग!
- Published by:Sachin S
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
तब्बल ३४ वर्षांनंतर आपल्या लाडक्या टाटा सियारा Tata Sierra ला मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेरीस जगासमोर आणलं आहे.
advertisement
1/11

90 चा दशकामध्ये मार्केटवर राज्य करणारी किंग साईज एसयूव्ही अखेरीस लाँच झाली आहे. टाटा मोटर्सने तब्बल ३४ वर्षांनंतर आपल्या लाडक्या टाटा सियारा Tata Sierra ला मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेरीस जगासमोर आणलं आहे. नवीन Tata Sierra 2025 ही दिसायला जितकी सुंदर आहे, तितकेच तिचे फिचर्स आहे. .
advertisement
2/11
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून टाटा सियाराची किंमत किती असणार याबद्दल तर्क वितर्क लढवले जात होते, अखेरीस टाटाने यावरून पडदा बाजूला केला आहे. टाटा सियाराची किंमत एक्स शोरूम ११.४९ लाख इतकी ठेवण्यात आली आहे. Tata Sierra 2025 ची बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी ही १५ जानेवारी २०२६ पासून होणार आहे.
advertisement
3/11
मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये Tata Sierra 2025 चा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी Tata Sierra 2025 चे एकूण ७ व्हेरिएंट्स लाँच केले आहे. यामध्ये Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ असे मॉडेल आहे.
advertisement
4/11
Tata Sierra 2025 मध्ये दोन नवीन इंजिनचा समावेश केला आहे यामध्ये एक 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टरसह येतोय. तर दुसरं इंजिन हे 1.5-लिटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर इंजिन आहे जे म्यॅनुअल आणि DCA (डुअल क्लच ऑटोमॅटिक) दोन पर्याय दिले आहे. या शिवाय 1.5-लिटर क्रायोजेट डिझेल इंजिनचा सुद्धा पर्याय दिला आहे पण अजून तो लाँच केला नाही.
advertisement
5/11
Tata Sierra 2025 ही नवीन ARGOS आर्किटेक्चरवर तयार केली आहे. या कारचं डिझाईन एक क्लासिक आणि भावनेनं जोडलेलं आहे. ३४ वर्षांपूर्वीची सियारा आणि आताची नवीन Tata Sierra या दोघांचं कनेक्शन जोडण्यात आलं आहे. त्यामुळे ही Tata Sierra 2025 ही वेगळी आहे. या सियारामध्ये थ्री-क्वार्टर ग्लास कन्सेप्ट, आधुनिक फ्लश ग्लास पॅनल दिलं आहे.
advertisement
6/11
एसयूव्हीमध्ये फुल-LED लायटिंग दिली आहे. यामध्ये समोर संपूर्णपणे फूल रूंद अशी लाइट सेबर-स्टाइल LED DRL आणि LED बार दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सियारामध्ये 19-इंचाचे अलॉय व्हील्स, फ्लश डोर हँडल्स, कंट्रास्टिंग ब्लॅक रूफ बँड आणि एक क्लॅमशेल-स्टाइल टेलगेट दिला आहे.
advertisement
7/11
सेफ्टीच्या बाबतीत Tata Sierra 2025 मध्ये ६ एअर बॅग्स दिल्या आहेत .सोबतच इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक स्टँडर्ड दिले आहे. तसंच ADAS लेव्हल 2+ सुद्धा दिलं आहे. यामध्ये तब्बल 22 फंक्शन्स दिले आहे. टाटा मोटर्सने दावा केला आहे की, भारतातील सर्वात मोठा सनरूफ हा Tata Sierra 2025 मध्ये दिला आहे.
advertisement
8/11
Tata Sierra 2025 चं इंटीरियर सुद्धा प्रीमियम असंच आहे, थिएटर प्रो अँड-टू-अँड थ्री-स्क्रीन सेटअप दिला आहे. जे ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या पॅसेंजरला एक डिस्पले दिला आहे. साऊंडच्या बाबतीत बोलायचं झालं तर कारमध्ये डॉल्बी अटमॉस दिलं असून जे 12-स्पीकर JBL ऑडिओ सिस्टमसह येते.
advertisement
9/11
Tata Sierra 2025 ची केबिन ही खूप प्रशस्त अशीच आहे. गाडीमध्ये बसल्यावर सगळीकडे तुम्हाला भरपूर स्पेस मिळतो. इंटीरिअरमध्ये सॉफ्ट-टच मटेरियल, अम्बिएंट लायटिंग आणि कमीत कमी मेटॅलिक एक्सेंटचा वापर केला आहे. या सियारामध्ये एकापेक्षा एक फिचर्स दिले आहे.
advertisement
10/11
व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्रायव्हरसाठी मेमेरी फंक्शनसह पॉवर-एडजस्टेबल फ्रंट सीट, वायरलेस चार्जिंग, डुअल- झोन FATC (पूर्ण ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल), कूल्ड ग्लव्ह बॉक्स आणि एडजस्टेबल थाई सपोर्ट दिले आहे. सियाराही ६ रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये बंगाल रूज, कूर्ग क्लाउड्स, मुन्नार मिस्ट, प्रिस्टीन व्हाइट, प्योर ग्रे आणि अंडमान अॅडव्हेंचर.
advertisement
11/11
Tata Sierra 2025 लाँच झाली आहे, पण मार्केटमध्ये आता थेट टक्कर ही हुंदाई क्रेटा, मारुती सुझुकी Grand Vitara, होंडा Elevate, Skoda Kushak आणि Volkswagen Tigun शी असणार आहे. टाटाने सियाराची सुरुवाती किंमत ११ लाख ४९ हजार एक्स शोरूम मुंबई इतकी ठेवली आहे. या गाडीची बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Creta चं मार्केट होणार जाम, टाटाने टाकला मोठा डाव; Tata sierra ची किंमत इतकी कमी, सेफ्टीमध्येही किंग!