TRENDING:

करोडो बुडाले, बहिणीची हत्या झाली! टीव्हीची लोकप्रिय सून झाली कंगाल; आता अभिनेत्री हिमालयात मागतेय भिक्षा!

Last Updated:
Actress Life Ruined: टीव्हीवर तब्बल २७ वर्षे सूनेची आणि बहिणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचे आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलले आहे.
advertisement
1/9
करोडो बुडाले, बहिणीची हत्या झाली! टीव्हीची लोकप्रिय सून झाली कंगाल
मुंबई: टीव्हीवर तब्बल २७ वर्षे सूनेची आणि बहिणीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचे आयुष्य एका क्षणात पूर्णपणे बदलले आहे. ही कहाणी आहे, आयुष्यात आलेल्या एकापाठोपाठ एक अशा भीषण आघातांमुळे कंटाळलेल्या आणि सर्व ऐशोआराम सोडून साध्वी बनलेल्या अभिनेत्री नूपुर अलंकार यांची.
advertisement
2/9
बँक घोटाळा, बहिणीची हत्या आणि आईचे निधन या तिहेरी संकटाने त्यांचे आयुष्य इतके उद्ध्वस्त केले की, त्यांनी २०२० मध्ये संन्यास घेण्याचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
3/9
१९९० च्या दशकात 'शक्तिमान'मधून करिअरची सुरुवात केलेल्या नूपुर अलंकार यांनी 'घर की लक्ष्मी बेटियां'सह १५७ हून अधिक टीव्ही शोज आणि 'सांवरिया' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. २००२ मध्ये त्यांनी को-ॲक्टर अलंकार श्रीवास्तव यांच्याशी लग्न केले. त्यांचे आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखे सुरू होते, पण २०१९ मध्ये आलेल्या एका संकटाने सर्व काही बदलून टाकले.
advertisement
4/9
२०१९ मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची बातमी आली. नूपुर यांची आयुष्याची जवळपास एक कोटी रुपयांची रक्कम याच बँकेत होती. RBI ने खाते फ्रीज केल्यामुळे त्या पूर्णपणे कंगाल झाल्या. त्यांना दागिने विकावे लागले, मित्रांकडून ५०,००० रुपयांचे कर्ज घ्यावे लागले आणि एका सहकलाकाराकडून तर प्रवासासाठी ५०० रुपये घ्यावे लागले होते.
advertisement
5/9
२०१९ च्या आर्थिक संकटातून नूपुर सावरत असतानाच, २०२० हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक ठरले. जून २०२० मध्ये आई गंभीर आजारी पडल्या, पण पैसे नसल्यामुळे नूपुर त्यांच्यावर योग्य उपचार करू शकल्या नाहीत आणि आईचे निधन झाले.
advertisement
6/9
याच दुःखात त्यांची बहीण जिज्ञासा हिचा खून झाला. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते. आई-बहिणीच्या मृत्यूने नूपुर आतून पूर्णपणे तुटल्या. लहानपणापासून पाहिलेले भांडण, संपत्तीचे वाद आणि हत्या या भयानक घटनांमुळे त्यांचे मन संसारातून विटले.
advertisement
7/9
त्यांनी तीन महिने मौन साधना केली आणि त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पती अलंकार श्रीवास्तव यांना सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतला. नूपुर यांनी आपले सर्व कपडे आणि ऐषोआराम त्यागले, केस कापले आणि त्या केवळ एका साध्या वस्त्रात राहू लागल्या.
advertisement
8/9
सध्या त्या हिमालयात आश्रम आणि गुंफामध्ये राहून ध्यान करतात आणि गरज पडल्यास भिक्षा मागून जीवन जगतात. साधना करताना त्यांना उंदरांनी चावले, यामुळे त्यांना फ्रॉस्टबाइट देखील झाला होता.
advertisement
9/9
संन्यास घेण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या, "मला फक्त शांती हवी होती. जेव्हा तुम्हाला देवाचा साक्षात्कार होतो, तेव्हा तुम्हाला त्यांच्याशिवाय दुसरे काहीच नको असते." नूपुरच्या मदतीसाठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पोस्ट केल्यावर अभिनेता अक्षय कुमारने त्यांना १० लाख रुपयांची मदत केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
करोडो बुडाले, बहिणीची हत्या झाली! टीव्हीची लोकप्रिय सून झाली कंगाल; आता अभिनेत्री हिमालयात मागतेय भिक्षा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल