TRENDING:

Team India : 7 खेळाडूंचा फर्स्ट क्लासमध्ये जलवा, लगेच टीम इंडियात घ्या! तिघांची नावं तुम्हालाही माहिती नसतील

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. पहिली टेस्ट गमावल्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यातही पराभवाच्या छायेत आहे. या कामगिरीनंतर चाहत्यांकडून टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे.
advertisement
1/9
7 खेळाडूंचा फर्स्ट क्लासमध्ये जलवा, लगेच टीम इंडियात घ्या! तिघं माहितीही नसतील
कोलकात्यानंतर गुवाहाटीमध्ये पराभव झाल्यास टीम इंडियावर 2-0 ने व्हाईट वॉश व्हायची नामुष्की ओढवेल. याआधी मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाचा 3-0 ने पराभव झाला होता.
advertisement
2/9
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीनंतर टीममध्ये बदल करण्याची मागणी चाहते करत आहेत. मागच्या काही काळापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत, त्यांना टेस्ट टीममध्ये निवडण्याची मागणी चाहते करत आहेत.
advertisement
3/9
सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 82 इनिंग खेळून 65.61 च्या सरासरीने 4,593 रन केल्या आहेत. सरफराजच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 16 शतकं आणि 14 अर्धशतकं आहेत.
advertisement
4/9
ऋतुराज गायकवाडही मागच्या काही काळापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजने 43 सामन्यांमध्ये 9 अर्धशतकं आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने आणि 45.59 च्या सरासरीने 3,149 रन केले आहेत.
advertisement
5/9
विदर्भाच्या यश राठोडने 27 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 61.22 च्या सरासरीने 2,449 रन केले आहेत, ज्यात 9 शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. म्हणजेच यशने आतापर्यंत खेळलेल्या 27 सामन्यांपैकी 20 सामन्यांमध्ये अर्धशतक आणि त्यापेक्षा जास्त रन केले आहेत.
advertisement
6/9
तामिळनाडूकडून खेळणाऱ्या बाबा इंद्रजीतने 88 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 52.63 च्या सरासरीने 6 हजार रन केल्या आहेत. बाबा इंद्रजीतच्या नावावर 17 शतकं आणि 31 अर्धशतकं आहेत. 200 रन हा त्याचा प्रथम श्रेणीमधला सर्वाधिक स्कोअर आहे.
advertisement
7/9
विदर्भाकडून खेळणाऱ्या ध्रुव शोरीने 77 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.70 च्या सरासरीने 5,455 रन केले आहेत. ध्रुवने फर्स्ट क्लासमध्ये एकूण 15 शतकं आणि 24 अर्धशतकं केली आहेत.
advertisement
8/9
आधी मुंबई आणि आता महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या पृथ्वी शॉने 63 मॅचमध्ये 47.41 च्या सरासरीने 5,026 रन केले आहेत. पृथ्वीच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 14 शतकं आणि 21 अर्धशतकं आहेत.
advertisement
9/9
तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असलेल्या एन जगदीशन यानेही स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. जगदीशनने 58 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 11 शतकं आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने आणि 47.59 च्या सरासरीने 3,855 रन केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 7 खेळाडूंचा फर्स्ट क्लासमध्ये जलवा, लगेच टीम इंडियात घ्या! तिघांची नावं तुम्हालाही माहिती नसतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल