TRENDING:

27 लाखांची Tesla कार भारतात 69 लाखांना का विकली जातेय? नेमकी दिसायला कशी? खास PHOTOS

Last Updated:
ड्रायव्हरलेस फिचर्स, ५ स्टार सेफ्टी आणि दमदार फिचर्समुळे अमेरिकेत प्रसिद्ध असलेली टेस्ला कार अखेरीस भारतात लाँच झाली आहे.
advertisement
1/8
27 लाखांची Tesla कार भारतात 69 लाखांना का विकली जातेय? नेमकी दिसायला कशी? PHOTOS
ड्रायव्हरलेस फिचर्स, ५ स्टार सेफ्टी आणि दमदार फिचर्समुळे अमेरिकेत प्रसिद्ध असलेली टेस्ला कार अखेरीस भारतात लाँच झाली आहे. विशेष म्हणजे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत टेस्लाचं शोरूम उघडण्यात आलं आहे. आधीच भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सच्या ईव्ही गाड्यांनी मार्केटमध्ये आपलं स्थान भक्कम केलं आहे. पण, आता टेस्ला आता भारतीय कंपन्यांना आव्हान देणार आहे.
advertisement
2/8
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी परिसरातील टेस्साच्याा शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं.
advertisement
3/8
भारतात Tesla ची पहिली इलेक्ट्रिक कार Model Y लाँच करण्यात आली आहे. तर सर्वात जास्त रेंज असलेल्या कारची किंमत तब्बल ६७.८९ लाख रुपये असणार आहे.
advertisement
4/8
रिअल व्हील ड्राईव्हसह हे मॉडेल लाँच केलं आहे. यामध्ये जास्त रेंज व्हेरिएंट आणि रिअर व्हील ड्राइव्हसह विकली जाणार आहे. ४ व्हील ड्राईव्ह व्हेरिएंट मॉडेलच्या विक्रीबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. पण लवकरच ही गाडी भारतात लाँच होणार आहे. मुळाच टेस्ला ही कोणत्याही स्पोर्ट कारपेक्षा कमी नाही.
advertisement
5/8
बॅटरी आणि रेंज - Tesla Model Y मध्ये २ ऑप्शन दिले आहे. यामध्ये एक 60 kWh आणि दुसरा 75 kWh बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जवळपास 295hp इतकी पॉवर जनरेट करते.
advertisement
6/8
ड्राइव्हिंगच्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर 60 kWh बॅटरी पॅक एकदा फुल चार्ज झाली तर 500 किलोमीटर इतकी रेंज मिळेल. तर 75 kWh बॅटरी पॅक फुल चार्ज केल्यावर 622 किलोमीटर इतकी रेंज मिळेल.
advertisement
7/8
Tesla Model Y मध्ये 7 कलर ऑप्शन दिले आहे. ही कार 2 ट्रिममध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 15.4 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम फ्रंटला दिलं आहे. याशिवाय रिअरमध्ये 8 इंचाचा स्क्रीन सुद्धा दिला आहे. तर दुसरीकडे सीट अॅडजेस्ट करता येतं. यामध्ये ड्युल जोन ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, 19 इंचाचे क्रॉस फ्लो व्हील्स, फिक्स ग्लास रूफ आणि पॉवर रिअर लिफ्टगेट दिले आहे. स्पेसचा विचार केला तर या कारमध्ये ५ जण आरामात बसू शकतात. सीट एकदम आरामदायक आहे. भारतीय रस्त्यानुसार डिझाइन केले आहे.
advertisement
8/8
भारतात टेस्ला इतकी महाग का? भारतात टेस्ला ही मुळात तयार झाली नाही. त्यामुळे टेस्ला Y बेसिक किंमत ही २७ लाखांहून अधिक आहे, पण भारतात आयात केल्यामुळे या कारवर तब्बल २१ लाखांचा तर इंपोर्ट ड्युटी आणि इतर कर लागला आहे. इंपोर्ट ड्युटी ही सर्वात जास्त आहे. एवढंच नाहीतर आणखी जीएसटी तर बाकी आहे. आयात केलेल्या वस्तूवर जवळपास ५ टक्क्यांपेक्षा IGST आणि सेस २२ टक्के लागू होतो. त्यामुळे २७ लाखांची टेस्ला भारतातच्या रस्त्यावर येईपर्यंत तब्बल 63,82,490 रुपये मोजावे लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
27 लाखांची Tesla कार भारतात 69 लाखांना का विकली जातेय? नेमकी दिसायला कशी? खास PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल