TRENDING:

VinFast: हॉलिवूडच्या सिनेमात दिसणारी SUV अखेर आली भारतात, लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:
भारतात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा घेत व्हिएतनामीमधील लोकप्रिय कंपनी विनफास्टने अखेर भारतीय बाजारपेठेत एंट्री केली आहे.
advertisement
1/7
VinFast: हॉलिवूडच्या सिनेमात दिसणारी SUV अखेर आली भारतात, लूक पाहून पडाल प्रेमात
भारतात सध्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा घेत व्हिएतनामीमधील लोकप्रिय कंपनी विनफास्टने अखेर भारतीय बाजारपेठेत एंट्री केली आहे.  विनफास्टने भारतात VF6 आणि VF7 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या आहेत. दोन्ही मॉडेल्स CKD (पूर्णपणे नॉकडाउन) मार्गाने आणण्यात आल्या आहेत आणि तामिळनाडूमधील ब्रँडच्या कारखान्यात असेंबल केल्या आहेत.. VF6 आणि VF7 साठी बुकिंग आधीच सुरू झाली आहे आणि सुरत आणि चेन्नईमध्ये दोन शोरूम देखील उघडण्यात आली आहेत. या वर्षाच्या अखेरीस  27 शहरांमध्ये 35 शोरूमचे नेटवर्क निर्माण करण्याचे कार निर्मात्याचे उद्दिष्ट आहे.
advertisement
2/7
VinFast: हॉलिवूडच्या सिनेमात दिसणारी SUV अखेर आली भारतात, लूक पाहून पडाल प्रेमात
VinFast VF6 मध्ये 3 ट्रिम लेव्हल देण्यात आले आहे. अर्थ, विंड आणि विंड इन्फिनिटी. या एसयूव्हीची किंमत १६.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. VinFast VF7, हे एक मुख्य मॉडेल आहे, त्याची किंमत २०.८९ लाख रुपयांपासून सुरू होते. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
advertisement
3/7
VinFast VF6 किंमत किती?  - VinFast VF6 व्हेरिएंट एक्स-शोरूम अर्थ व्हेरिएंटची किंमत  १६,४९,००० रुपये, विंड  १७,७९,००० रुपये आणि विंड इन्फिनिटी व्हेरिएंटची किंमत १८,२९,०००  एक्स शोरूम इतकी ठेवण्यात आली आहे.  VinFast VF 7 ची किंमत अर्थ व्हेरिएंटची किंमत  २०,८९,०००,  विंड  २३,४९,०००  रुपये, विंड इन्फिनिटी २३,९९,०००,  स्काय  २४,९९,०००, स्काय इन्फिनिटी  व्हेरिएंटीची किंमत २५,४९,००० रुपये इतकी आहे. 
advertisement
4/7
१० वर्षे/ २ लाख किमी वॉरंटी - VinFast  VF7 आणि त्याच्या बॅटरी पॅकवर १० वर्षे/ २ लाख किमी मानक वॉरंटी देत ​​आहे. VF6 ला ७ वर्षे/ २ लाख किमी वॉरंटी आणि त्याच्या बॅटरीवर १० वर्षे/ २ लाख किमी वॉरंटी मिळते. खरेदीदारांना जुलै २०२८ पर्यंत VGreens चार्जर्सवर मोफत चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफसाठी ३ वर्षे मोफत देखभाल आणि मोफत पडदा देखील मिळेल.
advertisement
5/7
VF6: पॉवरट्रेन सेटअप - Vinfast VF6 रेंज आणि बॅटरी Vinfast VF6 चा पॉवरट्रेन सेटअप 59.6kWh बॅटरी पॅकद्वारे सज्ज आहे, जी सिंगल मोटर आणि FWD (फ्रंट-व्हील-ड्राइव्ह) सिस्टमसह येते. हे कॉन्फिगरेशन 204bhp पॉवर आणि 310Nm टॉर्क देते. Vinfast चा दावा आहे की, VF6 एका चार्जवर ARIA-मंजूर 468km रेंज देते. 10 ते 70% पर्यंत जलद चार्ज करण्यासाठी फक्त 25 मिनिटे लागतात. या एसयूव्हीचा व्हीलबेस 2,730mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 190mm आहे.
advertisement
6/7
VF7: रेंज आणि बॅटरी - Vinfast VF7 रेंज आणि बॅटरी Vinfast VF7 ला 70.8kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळते जी सिंगल मोटर किंवा ड्युअल-मोटर सेटअपसह घेता येतो. ते एका चार्जवर 532km ची रेंज देते. ड्युअल-मोटर AWD आवृत्ती जास्तीत जास्त 350bhp ची पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. ही EV फक्त 5.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते. 10% ते 70% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 24 मिनिटे लागतात.
advertisement
7/7
इंटीरिअर कसं आहे?  - VF6 अर्थ ट्रिम ऑल-ब्लॅक केबिन थीममध्ये उपलब्ध आहे, तर विंड ट्रिममध्ये ड्युअल-टोन मोचा ब्राउन आणि ब्लॅक इंटीरियर आहे. त्याचप्रमाणे, Vinfast VF7 अर्थ ट्रिममध्ये स्पोर्टी ऑल-ब्लॅक इंटीरियर थीम आहे, तर हाय विंड आणि स्काय व्हेरियंटमध्ये मोचा ब्राउन आणि ब्लॅक थीम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
VinFast: हॉलिवूडच्या सिनेमात दिसणारी SUV अखेर आली भारतात, लूक पाहून पडाल प्रेमात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल