दिव्यांग आई-वडिलांचे फेडले पांग, शेतमजुरी करून प्रदीप झाला पोलीसवाला!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दयनीय परिस्थिती असतानाही खचून न जाता प्रदीप याने मिळेल ते काम करून, शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले.
advertisement
1/7

जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती प्रामाणिकता असेल तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. जालना जिल्ह्यातील नांदापूर या छोट्याशा गावातील तरुणाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य, आई आणि वडील दोन्ही दिव्यांग. शेती अत्यंत तोकडी त्यामुळे उदरभरण याचाही प्रश्न. आई जमेल तसं शेतात काम करते.
advertisement
2/7
तर वडील गाणी गाऊन पडेल ते दान पदरात घेऊन कुटुंब चालवतात. अशा दयनीय परिस्थिती असतानाही खचून न जाता प्रदीप याने मिळेल ते काम करून, शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले.
advertisement
3/7
जालना जिल्ह्यातील नंदापूर हे एक छोटंस गाव. या गावातील काळे कुटुंब हे अत्यंत साधारण परिस्थिती असलेले कुटुंब. आई-वडील दोन्ही दिव्यांग असल्याने घरातील प्रदीप आणि संदीप या दोन मुलांवरच कुटुंबाचा गाडा चालवण्याची जबाबदारी. प्रदीप याचा मोठा भाऊ देखील पोलीस भरतीची तयारी करायचा.
advertisement
4/7
परंतु हाताची बोटे फ्रॅक्चर झाल्याने त्याचे स्वप्न भंग झालं. त्यानंतर छोटा भाऊ प्रदीप याने भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. देऊळगाव राजा इथे असलेल्या एका अकॅडमीमध्ये त्याने सराव केला.
advertisement
5/7
अवघ्या दीड वर्षांमध्ये पोलीस होण्याचे स्वप्न साकार केलं. त्याला मैदानी चाचणीत 41 तर लेखी परीक्षेत 86 गुण मिळाले आहेत. मुंबई कारागृह पोलीस इथे त्याची निवड झाली आहे.
advertisement
6/7
पोलीसच व्हावं असं माझं ध्येय नव्हतं. आधी मी आर्मीची तयारी करायचो. परंतु भावाचं पोलीस होण्याचे स्वप्न अधुरं राहू नये म्हणून पोलीस भरतीचा सराव करणं सुरू केला. सराव चांगला सुरू झाल्यानंतर देऊळगाव राजा इथे भैरवनाथ करिअर अकॅडमीला ऍडमिशन घेतलं.
advertisement
7/7
चांगला सराव केल्यामुळे मैदानी चाचणीत अडचण आली नाही. तर लेखी परीक्षेतही अपेक्षित गुण मिळाले. सराव करत असताना घरची अडचण भागावी म्हणून मिळेल ते काम केलं. आज पोलीस म्हणून निवड झाल्याने माझ्यासह संपूर्ण गावाला आनंद झाल्याचं प्रदीप काळे याने सांगितलं.