TRENDING:

महात्मा गांधींना कॉलेजमध्ये किती गुण मिळाले होते, विषयानुसार पाहा संपूर्ण गुणपत्रिका, photos

Last Updated:
Mahatma Gandhi College Marksheet : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत तुम्ही अनेक किस्से ऐकले असतील. मात्र, त्यांनी कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते आणि त्यांना किती गुण मिळाले होते, हे कदाचित अनेकांना माहिती नसेल. हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
1/5
महात्मा गांधींना कॉलेजमध्ये किती गुण मिळाले होते, विषयानुसार पाहा संपूर्ण...
दिल्ली राजघाट येथील संग्रहालयात महात्मा गांधी यांची गुणपत्रिका ठेवली आहे. ही त्यांची मूळ गुणपत्रिका आहे. गुजरातच्या भावनगरमधील सामल दास कॉलेजची ही गुणपत्रिका आहे. याठिकाणी देश-विदेशातून पर्यटक गांधीजींच्या आयुष्याशी संबंधित वस्तू पाहायला येतात.
advertisement
2/5
या गुणपत्रिकेमध्ये महात्मा गांधींना इंग्रजीत 89, द्वितीय भाषेत 45, गणितात 59 आणि इतिहासात फक्त 20 गुण आहेत. तर विज्ञानात 34 गुण आहेत. महात्मा गांधींच्या या मार्कशीटमध्ये विज्ञान आणि इतिहासाचे एकूण गुण केवळ 54 दिसतात.
advertisement
3/5
या गुणपत्रिकेमध्ये सर्व मुलांची एकूण संख्या 300 च्या वर आहे. तर महात्मा गांधींच्या सर्व विषयांचे गुण एकत्र केले तर त्यांची एकूण बेरीज केवळ 247 होते. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ही गुणपत्रिका दाखवतात आणि संख्येकडे लक्ष न देता त्यांच्या कलागुणांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देतात.
advertisement
4/5
महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे महान होते आणि आजही जग त्यांना त्यांच्या या गुणपत्रिकेसाठी नव्हे तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी आठवते. या फोटोत तुम्ही गांधीजींचे लिखाण पाहू शकता.
advertisement
5/5
ज्या जीपवरून महात्मा गांधींची अंत्ययात्रा काढण्यात आली होती, आजही ती या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
महात्मा गांधींना कॉलेजमध्ये किती गुण मिळाले होते, विषयानुसार पाहा संपूर्ण गुणपत्रिका, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल