UPSC Success Story संकटांनी खचेल तो शेतकरी पुत्र कसला! UPSC परीक्षेत अजिंक्यचं मोठं यश, महाराष्ट्रात टॉप
- Published by:News18 Marathi
Last Updated:
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जालन्यातील शेतकरी पुत्र अजिंक्य शिंदे महाराष्ट्रातून प्रथम आला आहे.
advertisement
1/9

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना जिल्ह्यातील</a> आनंदगाव येथील एका शेतकरी पुत्राने मोठं यश मिळवलंय. नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अजिंक्य शिंदे महाराष्ट्रातून प्रथम आला आहे.
advertisement
2/9
अजिंक्यचा ऑल इंडिया रँक 102 असून डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरचं पद मिळणार आहे. कोविड काळामध्ये भावाचं निधन झाल्यानंतर कुटुंबाचा भार सांभाळत अजिंक्यने यूपीएससी परीक्षेचं शिखर सर केलंय. नुसतं सरच केले नाही तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान देखील मिळवाय.
advertisement
3/9
जालना जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील अजिंक्य शिंदे याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर त्याने परभणी येथील सारंग विद्यालयात शिक्षण घेतलं. इयत्ता आठवी ते बारावीचे शिक्षण त्याने ज्ञान तीर्थ विद्यालयात घेतलं.
advertisement
4/9
ज्ञानतीर्थ विद्यालयातील नितीन लोहट शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचं खुळ अजिंक्यच्या डोक्यात घुसलं. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर त्याने अवघ्या दोनच वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
advertisement
5/9
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्याने पुणे गाठलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्याने बीएससीला प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोनामध्ये मोठे बंधू निळकंठ शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे तो प्रचंड खचला.
advertisement
6/9
या संकटातून स्वतःला सावरून अजिंक्यने कुटुंबाचा भार सांभाळत पुणे येथे यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. अखेर नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये यश मिळालं.
advertisement
7/9
अजिंक्यने महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात तो एमएससीचे शिक्षण घेतोय.
advertisement
8/9
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील आनंदगाव या छोट्याशा गावचा मी रहिवासी आहे. शेती हा आई-वडिलांचा पारंपारिक व्यवसाय आहे. भावाच्या पाठबळामुळे मी यूपीएससी करण्याचे ठरवलं. मात्र कोविड काळामध्ये निळकंठ शिंदे या माझ्या भावाचे निधन झालं तेव्हा मी खूप खचलो.
advertisement
9/9
पुन्हा नव्याने उभारी घेत अभ्यास केला आणि आज निकाल आपल्यासमोर आहे. खूप छान वाटतंय. डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर ही पोस्ट मला मिळेल अशी शक्यता अजिंक्य शिंदे यांनी बोलून दाखवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
UPSC Success Story संकटांनी खचेल तो शेतकरी पुत्र कसला! UPSC परीक्षेत अजिंक्यचं मोठं यश, महाराष्ट्रात टॉप