TRENDING:

Sindhudurg Crime : असे कसे आई-बाप? लेकराला जमिनीत पुरलं अन् 15 दिवसांनी बाहेर काढलं, सिंधुदुर्ग हादरलं

Last Updated:
सिंधुदुर्ग तालुक्यातील माळेवाड गावात 3 वर्षीय मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणातल्या पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/6
असे कसे आई-बाप? लेकराला जमिनीत पुरलं; 15 दिवसांनी बाहेर काढलं, सिंधुदुर्ग हादरलं
चिरेखाणीत काम करणाऱ्या कुटुंबातील चिमुरडी कुटुंबासोबत राहत होती, पण तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी तपास करत वडिलांसोबतच मुलीचा मृतदेह बाहेर काढला.
advertisement
2/6
मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मळेवाड गावातील डोंगर माळरानावर चिरेखाणीत या 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात होती.
advertisement
3/6
या चर्चेनंतर सावंतवाडी पोलिसांनी अधिक तपास करत संशयीत आरोपीकडून माहिती मिळवली. यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी चिरेखाणी जवळ असलेल्या माळरानावरून बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला.
advertisement
4/6
एका डंपरने बालिकेला धडक दिल्यानंतर अपघात झाला होता अशी माहिती समोर येत आहे. अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर डंपर चालकाने मुलीच्या आई-वडिलांना हाताशी धरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह चिरेखाणीत दफन केला.
advertisement
5/6
हे कुटुंब मूळ छत्तीसगडमधील असून रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीच्या मळेवाड येथे चिरेखाणीत काम करत होते.
advertisement
6/6
पीडित बालिकेच्या वडिलांना छत्तीसगडमधून बोलवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि मग मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
Sindhudurg Crime : असे कसे आई-बाप? लेकराला जमिनीत पुरलं अन् 15 दिवसांनी बाहेर काढलं, सिंधुदुर्ग हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल