TRENDING:

रश्मिका-विजयचं लग्न कॅन्सल? 2 फेब्रुवारीला होणार नाही विवाहसोहळा, लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री स्पष्टच बोलली

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda wedding: आज म्हणजेच २ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये हे जोडपं लग्नगाठ बांधणार, अशा बातम्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. पण चाहत्यांसाठी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, आज रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न होत नाहीये.
advertisement
1/8
रश्मिका-विजयचं लग्न कॅन्सल? लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री स्पष्टच बोलली
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जाणारे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली आहे. आज म्हणजेच २ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये हे जोडपं लग्नगाठ बांधणार, अशा बातम्यांनी काल रात्रीपासून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.
advertisement
2/8
एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने उदयपूर पॅलेसचा व्हिडिओ शेअर करून या चर्चेला हवा दिली होती. पण चाहत्यांसाठी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, आज रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न होत नाहीये.
advertisement
3/8
सकाळी एका इन्फ्लुएन्सरने व्हिडिओ पोस्ट करत दावा केला होता की, उदयपूर पॅलेसमध्ये एका मोठ्या सेलिब्रिटी लग्नाची तयारी सुरू आहे आणि ते सेलिब्रिटी दुसरे तिसरे कोणी नसून रश्मिका आणि विजय आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
4/8
मात्र, 'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, रश्मिका मंदानाने या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. रश्मिकाने स्वतः या वृत्ताचं खंडन केलं असून आज तिचं लग्न नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
advertisement
5/8
आज लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला, तरी चाहत्यांची उत्सुकता काही कमी झालेली नाही. आता सोशल मीडियावर एक नवीन तारीख जोर पकडत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपं आज नाही तर २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
गेल्या वर्षी या दोघांनी एका खाजगी समारंभात गुपचूप साखरपुडा उरकल्याचे दावेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आले होते, मात्र या दोघांनीही त्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही.
advertisement
7/8
रश्मिका आणि विजय यांच्यातील केमिस्ट्री पहिल्यांदा 'गीता गोविंदम' चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर 'डिअर कॉम्रेड'मध्येही या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. तेव्हापासूनच हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र दिसणं आणि एकमेकांबद्दलचे संकेत देणं यामुळे चाहत्यांना खात्री आहे की हे दोघं लवकरच कपल म्हणून समोर येतील.
advertisement
8/8
विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन पाळलं आहे. हे मौन त्यांच्या नात्यातील गांभीर्य दर्शवतं की केवळ ही एक चांगली मैत्री आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, रश्मिकाच्या ताज्या प्रतिक्रियेमुळे आज तरी उदयपूरमध्ये सनई-चौघडा वाजणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिका-विजयचं लग्न कॅन्सल? 2 फेब्रुवारीला होणार नाही विवाहसोहळा, लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री स्पष्टच बोलली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल