प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, सुटकेसच्या टॅगनं उलगडलं हत्येचं गूढ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दुबईहून आलेल्या नौशादची पत्नी रजिया सुल्तानने प्रियकर रोमान आणि मित्र हिमांशुच्या मदतीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे ट्रॉली बॅगमध्ये भरून 60 किमी दूर फेकले.
advertisement
1/7

अनैतिक संबंध, प्रेम आणि नात्यात अडसर ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी निळा ड्रम वापरल्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पतीची हत्या करुन त्याचे तुकडे तुकडे करुन बॅगमध्ये भरून ते घरापासून दूर फेकण्यात आले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
2/7
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकरासोबत मिळून कायमचं संपवायचं ठरवलं आणि पत्नी आणि प्रियकराने संधी साधून अखेर काटा काढला. दुबईहून आलेल्या पतीला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे संपूर्ण गाव हादरुन गेलं.
advertisement
3/7
प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं नवऱ्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याने आणलेल्या बागेत भरले आणि 60 किलोमीटर दूर शेतात ती बॅग फेकून दिली. शेतात गहू कापायला आलेल्या गावकऱ्यांनी ही बॅग बघितली आणि त्यांना संशय आला. त्यांनी तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
4/7
पोलीस घटनास्थळी पोहोचताच बॅग उघडली आणि त्यामधून एका तरुणाचा अर्धवट प्लास्टिक आणि गोणपाटात गुंडाळलेला मृतदेह सापडला. पत्नी तिचा प्रियकर आणि मित्र तिघांनी मिळून हा हत्येचा कट रचल्याची प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली आहे.
advertisement
5/7
मृत नौशाद केवळ दहा दिवसांपूर्वीच दुबईहून परतला होता आणि त्याच्या गैरहजेरीत त्याची पत्नी रजिया सुल्तानचे भाच्यासोबत अनैतिक संबंध होते. नौशादच्या येण्याने अडसर झाला म्हणून, नशेचे अन्न देऊन, झोपेत असताना त्याच्या डोक्यावर चाकू, मूसळ आणि कुऱ्हाडीने वार करण्यात आला.
advertisement
6/7
मृतदेह आधी सूटकेसमध्ये भरायचा प्रयत्न झाला, परंतु जागा अपुरी पडल्यामुळे शेवटी पती दुबईहून आणलेल्या ट्रॉली बॅगचा वापर करण्यात आला. सुटकेसवरील टॅग काढायला मात्र विसरले आणि त्यावरुन हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांना या टॅगमुळे पुरावा मिळाला आणि संशयाची सुई पत्नीवर आली.
advertisement
7/7
तिचा प्रियकर रोमान आणि मित्र हिमांशु फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात आहेत. ट्रॉली बॅग, खूनासाठी वापरलेली चापर, मूसळ, कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहेत. १२ तासांत या खूनाचा उलगडा करण्यात आल्याचे पोलिसांनी जाहीर केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काढला काटा, सुटकेसच्या टॅगनं उलगडलं हत्येचं गूढ