व्हीलचेअरवर काढली 3 वर्ष, 5 वेळा घरातून पळाली; अफगाणी वंशाच्या दबंग सिंगरला मुंबईने दिली ओळख, कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काही लोकांचं आयुष्य एखाद्या चित्रपटालाही लाजवेल इतकं नाट्यमय असतं. आज आपण अशा एका अभिनेत्री-गायिकेबद्दल बोलत आहोत, जिचा आवाज जेवढा धारदार आहे, तेवढंच तिचं आयुष्य संघर्षमय आहे.
advertisement
1/10

काही लोकांचं आयुष्य एखाद्या चित्रपटालाही लाजवेल इतकं नाट्यमय असतं. आज आपण अशा एका अभिनेत्री-गायिकेबद्दल बोलत आहोत, जिचा आवाज जेवढा धारदार आहे, तेवढंच तिचं आयुष्य संघर्षमय आहे.
advertisement
2/10
'बिग बॉस १७' मुळे घराघरांत पोहोचलेली आणि The 50 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपल्या गेमने सर्वांना घायाळ करणारी ३० वर्षीय रॅपर खानजादी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
advertisement
3/10
आसामच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला तिचा प्रवास आज बॉलीवूडच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे, पण या प्रवासातील काटेरी रस्ते काळजाचा थरकाप उडवणारे आहेत.
advertisement
4/10
खानजादी, जिचं खरं नाव फिरोझा खान आहे, तिचा जन्म आसाममध्ये झाला. तिची ओळख जितकी विविधांगी आहे, तितकीच ती रंजकही आहे. फिरोझाचे वडील अफगाणिस्तानचे आहेत, तर तिची आई भारतीय (आसामी) आहे.
advertisement
5/10
रॅपर, सिंगर आणि म्युझिशियन असलेल्या फिरोझाला लहानपणापासूनच लिहिण्याची आणि गाण्याची प्रचंड आवड होती. मात्र, आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी तिला जे करावं लागलं, ते कोणत्याही मुलीसाठी सोपं नव्हतं.
advertisement
6/10
आपली गाणी आणि आपला रॅप जगाला ऐकवण्यासाठी फिरोझा कित्येकदा घर सोडून पळाली. 'बिग बॉस'मध्ये तिने स्वतः खुलासा केला होता की, ती एकदा-दोनदा नाही तर चक्क पाच वेळा आसाममधील आपलं घर सोडून पळून आली होती.
advertisement
7/10
मुंबईत येऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी तिने केलेला हा बंडखोर प्रयत्न आज तिला यशाच्या शिखरावर घेऊन आला आहे. २०२२ मध्ये 'हसल २.०' मध्ये तिने गायलेलं 'आझादी' हे गाणं तिच्या स्वतःच्या आयुष्याचं प्रतिबिंब होतं.
advertisement
8/10
फिरोझाच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ तो होता जेव्हा ती तब्बल तीन वर्ष व्हीलचेअरवर होती. तिच्या शरीराने साथ देणं सोडलं होतं, पण मनाने कधीच हार मानली नाही. 'बिग बॉस १७' मध्ये तिने आपल्या आजाराबद्दल अनेकदा भाष्य केलं, ज्यामुळे तिला सलमान खानच्या रागालाही सामोरं जावं लागलं होतं.
advertisement
9/10
तरीही, तो आजार नेमका काय होता, हे गुपित तिने अद्याप पूर्णपणे उघड केलेलं नाही. तिच्या त्या कठीण काळात तिने पाहिलेलं दुःख आजही तिच्या गाण्यांमधून आणि बोलण्यातून अधूनमधून डोकावत असतं.
advertisement
10/10
'बिग बॉस १७' मधून बाहेर पडल्यानंतर फिरोझाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आणि नुकतंच ती 'द ५०' या ओटीटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. बेधडक स्वभाव आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे फिरोझा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
व्हीलचेअरवर काढली 3 वर्ष, 5 वेळा घरातून पळाली; अफगाणी वंशाच्या दबंग सिंगरला मुंबईने दिली ओळख, कोण आहे ती?