T20 World Cup : टीम इंडियाच्या 'ब्लंडर'ने न्यूझीलंडला फायनलचं तिकीट... सूर्याची कबुली अन् सॅन्टनरने डाव साधला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल तर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार आहे.
advertisement
1/8

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या इडन गार्डनवर टॉस हा महत्त्वाची भूमिका बजावतो हे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या सामन्याने दाखवून दिलं.
advertisement
2/8
इडन गार्डनवर दुसऱ्या इनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर दव येतं, त्यामुळे बॉलरना बॉल हातात घेणंही कठीण होतं. याच कारणामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून सेमी फायनलमध्ये धडक मारली.
advertisement
3/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 76 रननी दारूण पराभव झाला. डेव्हिड मिलर, डेवाल्ड ब्रेविस आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी भारतीय बॉलिंगवर आक्रमण केलं. मिलरने 35 बॉल 63, ब्रेविसने 29 बॉल 45 आणि स्टब्सने 24 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले.
advertisement
4/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने अक्षर पटेलला बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली, पण पराभव झाल्यानंतर अक्षरला बाहेर ठेवण्यात चूक झाल्याचं टीम इंडियाकडून मान्य केलं गेलं, यानंतर पुढच्या सामन्यात अक्षरचं टीममध्ये कमबॅक झालं.
advertisement
5/8
दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये डावखुरे बॅटर जास्त आहेत. डावखुऱ्या बॅटरना डावखुऱ्या स्पिनरवर आक्रमण करणं सोपं जातं, त्यामुळे टीम इंडियाने अक्षर पटेलला बाहेर ठेवलं.
advertisement
6/8
न्यूझीलंडने मात्र टीम इंडियाने केलेली ही चूक टाळली आणि मिचेल सॅन्टनर-रचिन रवींद्र या दोन डावखुऱ्या स्पिनरना दोन्ही एन्डने बॉलिंग दिली, याचा फायदा त्यांना झाला. रचिन रवींद्रने धोकादायक आणि डावखुऱ्या डेव्हिड मिलरला 6 रनवरच आऊट केलं, याशिवाय त्याने एडन मार्करमचीही विकेट घेतली.
advertisement
7/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला 2 ओव्हर दिल्या यात त्याने एकही विकेट न घेता 17 रन दिल्या, तर दुसरीकडे न्यूझीलंडचा ऑफ स्पिनर कोले मॅककॉनचिएने इनिंगच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या दोन विकेट घेतल्या.
advertisement
8/8
दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरे बॅटर असतानाही डावखुऱ्या स्पिनरना खेळवणं आणि ऑफ स्पिनरचा योग्य उपयोग करणं ही रणनीती किवी टीमने सेमी फायनलमध्ये वापरली. टीम इंडियाने केलेल्या चुका न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने टाळल्या, त्यामुळे न्यूझीलंड टी-20 वर्ल्ड कप फायनलच्या जवळ पोहोचली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाच्या 'ब्लंडर'ने न्यूझीलंडला फायनलचं तिकीट... सूर्याची कबुली अन् सॅन्टनरने डाव साधला!