Usha Nadkarni: 'माझ्या मेंदूला किडे लागले', उषा नाडकर्णींना झालं तरी काय? थेट कलाकारांचे वाभाडेच काढले
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Usha Nadkarni: "बिग बॉस बघून माझ्या मेंदूला किडे लागले," असं म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी शोच्या सध्याच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
advertisement
1/8

मराठी सिनेसृष्टीतील खळ्ळ-खट्याक व्यक्तिमत्व आणि आपल्या रोखठोक विधानांनी भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्या आहेत. निमित्त आहे सध्या सुरू असलेला 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन.
advertisement
2/8
या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरात आरडाओरडा आणि ड्रामा शिगेला पोहोचला असताना, पहिल्या सीझनमध्ये आपल्या आवाजाने घर दणाणून सोडणाऱ्या 'आऊ'नी सध्याच्या स्पर्धकांच्या वागण्यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
3/8
"बिग बॉस बघून माझ्या मेंदूला किडे लागले," असं म्हणत त्यांनी या शोच्या सध्याच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
advertisement
4/8
'राजश्री मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी आपला नेहमीचा बाणा दाखवला. त्या म्हणाल्या की, मी हल्ली बिग बॉस बघतच नाही. "आमचा सीझन संपल्यानंतर मी फक्त दुसरा सीझन थोडाफार पाहिला होता. पण आता जे काही सुरू आहे, जो काही कलकलाट आणि हुज्जत घालणं सुरू असतं, ते पाहून मेंदूला किडे लागल्यासारखं वाटतं. त्या लोकांचं वागणं आणि ओरडणं सहन करण्याच्या पलीकडे आहे."
advertisement
5/8
सध्याच्या घरात वयाचा दाखला देऊन काम टाळणाऱ्या स्पर्धकांचा उषा नाडकर्णींनी चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा बिग बॉसमध्ये गेले होते तेव्हा मी ७० वर्षांची होते. पण मी कधीही 'मी ज्येष्ठ आहे, मी हे काम करणार नाही' असा तोरा मिरवला नाही."
advertisement
6/8
त्या पुढे म्हणाल्या, "पण आताचे स्पर्धक तर ५० व्या वर्षीच स्वतःला खूप सीनियर समजतात आणि कामं टाळतात. मी आजही माझ्या घरातली सगळी कामं स्वतः करते. घरात आपण वय झालं म्हणून काम करणं थांबवतो का? मग शोमध्ये गेलं की हे नाटक कशासाठी?"
advertisement
7/8
बिग बॉसमध्ये जाऊन तुम्हाला नक्की काय मिळालं? या प्रश्नावर त्यांनी अत्यंत प्रांजळ उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, "फायदा झाला तो फक्त पैशांचा. बाकी 'बिग बॉस' केलं म्हणून लोक मला ओळखायला लागले असं काही नाही. लोक मला माझ्या आधीच्या कामामुळे आधीपासूनच ओळखतात. उलट तिथे गेल्यामुळे मला त्रास झाला आणि डोकं फिरलं."
advertisement
8/8
जेव्हा त्यांना विचारलं की, तुम्हाला या सीझनमधील कोणता स्पर्धक आवडतो? त्यावर त्या उपरोधिकपणे म्हणाल्या, "मी काही सांगितलं तर ते ऐकणार आहेत का? आणि तुम्ही त्यांना हे दाखवायला जाणार आहात का? प्रत्येक जण तिथल्या परिस्थितीनुसार वागत असतो." अशा शब्दांत त्यांनी कोणाचंही नाव घेणं टाळत सध्याच्या ड्रामावर आपली नाराजी स्पष्ट केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Usha Nadkarni: 'माझ्या मेंदूला किडे लागले', उषा नाडकर्णींना झालं तरी काय? थेट कलाकारांचे वाभाडेच काढले