TRENDING:

Shreya Ghoshal: युट्यूबरवर गाणं हिट, तरीही श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' सारखी गाणी न गाण्याचा घेतला निर्णय; कारण काय?

Last Updated:
आपल्या आवाजाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, प्रत्येक प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलीये. कोणत्याही भाषेतलं गाणं असो, आपल्या सुमधुर आवाजाने जगभरातल्या चाहत्यांच्या मनावर तिने छाप पाडलीये. ही गायिका दुसरी तिसरी कोणीही नसून सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आहे. श्रेयाने अलीकडेच केलेल्या एका खळबळजनक खुलाशामुळे सध्या ती तुफान चर्चेत आली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
1/6
श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' सारखी गाणी न गाण्याचा घेतला निर्णय; कारण काय?
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिला आज विशेष ओळखीची गरज नाही. तिने आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक चित्रपटातल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारी श्रेया सध्या तिच्या विधानामुळे चर्चेत आली आहे. तिने एका चित्रपटातील गाण्याला पुन्हा गाण्यासाठी नकार दिला आहे, नेमकं गायिका त्या गाण्याबद्दल असं का म्हणाली? जाणून घेऊया...
advertisement
2/6
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयाने एक खळबळजनक खुलासा केला आहे. तिच्या खुलाश्याची सध्या तुफान चर्चा होतेय. 2012 साली रिलीज झालेल्या 'अग्निपथ' चित्रपटातल्या 'चिकनी चमेली' गाण्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. या गाण्याबद्दल अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण तिची ही प्रतिक्रिया तुफान चर्चेत आली आहे.
advertisement
3/6
श्रेया म्हणाली की, "खरंतर, 'चिकनी चमेली' हे गाणं गाताना काहीही वाटलं नाही. पण जेव्हा ते गाणं हिट झालं त्यानंतर मला अनेक आयटम साँग्ससाठी ऑफर्स आल्या होत्या. पण त्या गाण्यातले शब्द अत्यंत विचित्र होते आणि महिलांना ऑब्जेक्टीफाय करणारे होते. म्हणून मी त्यानंतर तसे गाणे गाणंच बंद करून टाकलं."
advertisement
4/6
पुढे श्रेया म्हणाली की, "मला माझ्या एका संगीतकार मित्राने, 'चिकनी चमेली' गाण्यानंतर एक गाणं सजेस्ट केलं होतं. त्या गाण्याचे शब्द वाचूनच मला फार लाज वाटली होती. म्हणून, मी ते गाणं करण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. जेव्हा ते गाणं वाचत होते, त्यावेळी ते फिल करतानाच मला फार विचित्र वाटलं होतं. म्हणून मी स्पष्टपणे नकार दिला."
advertisement
5/6
'चिकनी चमेली' गाण्याबद्दल श्रेया म्हणाली की, "ते फक्त गाणे नसून एक मजेदार गाणे आहे, त्यात एक कलात्मकता (Artistry) देखील आहे. चित्रपटात जे व्हर्जन आले ते सुरुवातीच्या ड्राफ्ट्सपेक्षा बरेच सौम्य होते. त्यावेळी मी इतकी प्रगल्भ नव्हते की, प्रत्येक ओळीचा सखोल अर्थ समजू शकेन. पण, आता मी गाणे रेकॉर्ड करताना खूप विचार करते."
advertisement
6/6
पुढे गायिका म्हणाली की, "कारण एकदा गाणे हिट झाले की ते लहान मुलांसमोरही गावे लागते आणि अशा वेळी मला अस्वस्थ वाटते." ऑब्जेक्टिफिकेशनवर बोलता मग कॉन्सर्टमध्ये 'चिकनी चमेली' का गाता? या प्रश्नावर गायिका म्हणाली की, "मला त्या गाण्याची काहीही लाज वाटत नाही. मी ते परफॉर्म केले आहे आणि मलाही ते गाणे आवडते. मी त्या गाण्याला नाकारू शकत नाही, कारण ते माझे गाणे आहे. पण भविष्यात मी तशा प्रकारची गाणी रेकॉर्ड करणार नाही, हे नक्की."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shreya Ghoshal: युट्यूबरवर गाणं हिट, तरीही श्रेया घोषालने 'चिकनी चमेली' सारखी गाणी न गाण्याचा घेतला निर्णय; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल