90s ची क्रश, 'मेड इन इंडिया' गर्लचं प्रत्येक पार्टीत वाजायचं गाणं; ओळखलं का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
90s Singer : 90 च्या दशकातील अनेकांची क्रश, मेड इन इंडिया फेम गायिका सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. गायिकेचा लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

इंडियन पॉप सिंगर अलीशा चिनॉय 90 च्या दशकात अनेकांची क्रश होती. 'मेड इन इंडिया' गाणारी अलीशा 90 च्या दशकात चांगलीच लोकप्रिय होती. पण सध्या मात्र ती लाइमलाइटपासून दूर आहे.
advertisement
2/7
अलीशा चिनॉयने एकापेक्षा एक गाणी गायली आहेत. यात 'कजरारे'चाही समावेश आहे.
advertisement
3/7
अलीशा चिनॉय मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तर सोशल मीडियावर मात्र खूप सक्रीय आहे. आपल्या गाण्याचे व्हिडीओ आणि फोटो त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
advertisement
4/7
अलीशा चिनॉय यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील त्यांचा बदलेला लुक पाहून चाहते हैरान झाले आहेत.
advertisement
5/7
अलीशा चिनॉय यांनी 1985 मध्ये आलेल्या 'जादू' या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून आपल्या गाण्याची सुरुवात केली.
advertisement
6/7
'क्वीन ऑफ इंडी पॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलीशा चिनॉय यांच्या हिट गाण्यांमध्ये 'काटे नहीं कटते', 'रुक रुक रुक', 'मेड इन इंडिया', 'आजा मेरे दिल में', 'कजरा रे', 'नो एंट्री', 'तिनका तिनका', 'दिल तू ही बता' या गाण्यांचा समावेश आहे.
advertisement
7/7
अलीशा चिनॉय यांच्या बदलेल्या लूकने सर्वांनाच थक्क केलं आहे. त्यांच्या फोटोवर चाहत्यांनी अलीशा चिनॉय?, अलीशा चिनॉय यांना नक्की काय झालंय? खूप शॉकिंग आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
90s ची क्रश, 'मेड इन इंडिया' गर्लचं प्रत्येक पार्टीत वाजायचं गाणं; ओळखलं का?