TRENDING:

TV विश्वातील आणखी एका जोडप्यात दुरावा! लग्नाच्या 4 वर्षांनी मोडणार सुखी संसार, घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

Last Updated:
Celebrity Divorce : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या लाडक्या सेलिब्रिटी जोड्या एकमेकांपासून वेगळे होताना दिसत आहेत. अशातच टीव्हीवरील लोकप्रिय जोडीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
1/8
TV विश्वातील आणखी एका जोडप्यात दुरावा! लग्नाच्या 4 वर्षांनी मोडणार सुखी संसार
मुंबई: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेते नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत्या. हे दोघेही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सणांमध्ये एकमेकांपासून लांब दिसले होते. मात्र, आता या चर्चांना धक्कादायक पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
advertisement
2/8
‘न्यूज18 शोशा’ ने दिलेल्या माहितीनुसार, 'गुम है किसी के प्यार में' या लोकप्रिय मालिकेतील 'विराट' आणि 'पाखी' म्हणजेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
advertisement
3/8
कपलच्या जवळच्या एका व्यक्तीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, "ऐश्वर्या शर्मा आणि नील दोघेही गेल्या बऱ्याच काळापासून वेगळे राहत होते. आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे. लवकरच याबद्दलच्या औपचारिक प्रक्रिया सुरू होतील."
advertisement
4/8
घटस्फोटाचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चार वर्षांच्या संसारानंतर ही जोडी आता कायमची वेगळी होत असल्याचे हे वृत्त आहे. दरम्यान, याबद्दल अद्याप या कपलने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
advertisement
5/8
नील आणि ऐश्वर्या यांची भेट स्टार प्लस वाहिनीवरील सुपरहिट सीरियल 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर झाली. नीलने यात 'विराट' तर ऐश्वर्याने 'पाखी'ची भूमिका साकारली होती. पडद्यावरची जोडी लवकरच खऱ्या आयुष्यात प्रेमबंधनात अडकली.
advertisement
6/8
त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि त्यांनी २०२१ मध्ये लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही 'बिग बॉस १७' मध्ये एकत्र दिसले होते. या शोमधील त्यांची स्वीट अँड स्पाइसी केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
advertisement
7/8
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे कपल अनेक महत्त्वाच्या प्रसंगी एकत्र दिसले नव्हते. गणेश चतुर्थी असो किंवा दिवाळी, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी दिसले होते, ज्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना जोर आला होता.
advertisement
8/8
या वर्षाच्या सुरुवातीला ऐश्वर्या शर्माने एक सोशल मीडिया पोस्ट केली होती, ज्यात तिने तिच्या नावावर नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांना टोमणा मारला होता. "मी गप्प आहे, याचा अर्थ मी कमजोर आहे असे समजू नका," असे तिने त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV विश्वातील आणखी एका जोडप्यात दुरावा! लग्नाच्या 4 वर्षांनी मोडणार सुखी संसार, घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल