TRENDING:

Dhurandhar पेक्षाही जबरदस्त स्पाय थ्रिलर, केलेली 1500 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर केलेला कब्जा, OTT वरील मस्ट वॉच फिल्म

Last Updated:
Best Suspense Thriller on OTT : तुम्हाला 'धुरंधर २' रिलीज होण्यापूर्वी जर तुम्हाला त्यापेक्षाही भयानक सस्पेन्स आणि डोकं चक्रावून टाकणारा थरार अनुभवायचा असेल, तर एक असा चित्रपट आहे ज्याने जगभरात १५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता.
advertisement
1/8
Dhurandhar पेक्षाही जबरदस्त स्पाय थ्रिलर, 1500 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर केलेला कब्जा
सध्या भारतीय सिनेसृष्टीत आदित्य धर यांच्या 'धुरंधर'ची चर्चा आहे. रणवीर सिंग आणि संजय दत्तच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर १३०० कोटींचा आकडा पार करून स्पाई थ्रिलर चित्रपटांचे परिमाण बदलले.
advertisement
2/8
पण तुम्हाला 'धुरंधर २' रिलीज होण्यापूर्वी जर तुम्हाला त्यापेक्षाही भयानक सस्पेन्स आणि डोकं चक्रावून टाकणारा थरार अनुभवायचा असेल, तर एक असा चित्रपट आहे ज्याने जगभरात १५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. हा चित्रपट आजही स्पाई थ्रिलर प्रेमींसाठी मस्ट वॉचच्या यादीत अव्वल आहे.
advertisement
3/8
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर विजेता दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांचा 'ब्रिज ऑफ स्पाइस' हा मास्टरपीस केवळ कल्पनेवर आधारित नसून 'कोल्ड वॉर' म्हणजेच शीतयुद्धाच्या काळातील एका खऱ्या आणि थरारक घटनेवर बेतलेला आहे.
advertisement
4/8
चित्रपटाची कथा जेम्स डोनोवन (टॉम हँक्स) या वकिलाभोवती फिरते, ज्याला एका सोव्हिएत रशियन हेरची बाजू कोर्टात लढवायची असते. पण ही एक साधी केस नसून पुढे ती एका खतरनाक आंतरराष्ट्रीय मिशनमध्ये रूपांतरित होते.
advertisement
5/8
दोन देशांमधील हेरांची अदला-बदली करण्याचं हे मिशन इतकं गुंतवणारं आहे की, २ तास २२ मिनिटांच्या या चित्रपटात तुम्ही एका मिनिटासाठीही डोळे मिटणार नाहीत.
advertisement
6/8
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जे यश मिळवलं, ते पाहून भल्याभल्यांचे डोळे विस्फारले होते. या चित्रपटाने सुमारे ४० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७० कोटी रुपये कमावले होते, तर जगभरात त्याने १६५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.
advertisement
7/8
दिग्गज अभिनेता टॉम हँक्सने आपल्या अभिनयाने वकिलाची भूमिका अजरामर केली आहे. हेरगिरी म्हणजे फक्त गोळ्या झाडणं किंवा गाड्या उडवणं नसतं, तर डोक्याचा वापर करून जगाला कसं वाचवायचं, हे यात उत्तमरित्या दाखवलं आहे.
advertisement
8/8
आपल्या खर्चापेक्षा चौपट कमाई करून या सिनेमाने इतिहास रचला होता. आजही या चित्रपटाला 7.6/10 अशी दमदार IMDb रेटिंग मिळालेली आहे. जर तुम्ही 'धुरंधर २' ची वाट पाहत असाल, तर हा चित्रपट आता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar पेक्षाही जबरदस्त स्पाय थ्रिलर, केलेली 1500 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर केलेला कब्जा, OTT वरील मस्ट वॉच फिल्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल