'बाल्कनी ग्रुप'ला मोठा झटका! 9 व्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट; रडून रडून बेहाल झाला सागर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 6 Eviction : दर आठवड्याला एक-एक चेहरा कमी होत असताना, या रविवारी मात्र बाल्कनी ग्रुपला मोठा धक्का बसला आहे. सुरांची राणी आणि घरामध्ये संयमाने खेळणारी प्राजक्ता शुक्रे हिचा या शोमधील प्रवास अखेर थांबला आहे.
advertisement
1/9

मुंबई : रितेश देशमुखच्या 'भाऊच्या धक्क्या'वर आज पुन्हा एकदा सुन्न करणारी शांतता पसरली. १७ स्पर्धकांसह दिमाखात सुरू झालेला 'बिग बॉस मराठी ६' चा प्रवास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.
advertisement
2/9
दर आठवड्याला एक-एक चेहरा कमी होत असताना, या रविवारी मात्र बाल्कनी ग्रुपला मोठा धक्का बसला आहे. सुरांची राणी आणि घरामध्ये संयमाने खेळणारी प्राजक्ता शुक्रे हिचा या शोमधील प्रवास अखेर थांबला आहे.
advertisement
3/9
या आठवड्यात नॉमिनेशनच्या कचाट्यात एकूण सहा जण अडकले होते. यामध्ये प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, संकेत पाठक, रेवा कौरसे आणि अनुश्री माने यांचा समावेश होता.
advertisement
4/9
सोशल मीडियावरील सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार, तन्वी कोलते आणि अनुश्री माने यांनी मतदानात मोठी आघाडी घेतली होती, तर संकेत आणि दिपाली हे सुरक्षित झोनमध्ये खेळत होते.
advertisement
5/9
मात्र, खरी टांगती तलवार अनुश्री, रेवा आणि प्राजक्ता यांच्यावर होती. सुरुवातीपासूनच प्राजक्ता बॉटम दोन स्पर्धकांमध्ये गणली जात होती. अखेर मतांच्या आधारावर, प्राजक्ताला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
6/9
प्राजक्ताच्या बाहेर जाण्याने सर्वात मोठा फटका सागर कारंडे याला बसणार आहे. बाल्कनी ग्रुपचा एक खंबीर आधार म्हणून प्राजक्ता ओळखली जात होती.
advertisement
7/9
आता प्राजक्ताही गेल्यामुळे सागर कारंडे आता घरात किती प्रबळपणे टिकून राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. घरातील समीकरणे आता पूर्णपणे बदलणार असून, सागर आता कोणाशी हातमिळवणी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
8/9
या मोसमाची सुरुवात १७ स्पर्धकांनी केली होती. तन्वी कोलते, रुचिता जामदार आणि दिपाली सय्यद यांच्या भांडणांनी आणि वादांनी हा सीझन चांगलाच गाजला.
advertisement
9/9
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओमकार राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत आणि गेल्या आठवड्यात रुचिता जामदार असे एकामागून एक तगडे खेळाडू बाहेर पडले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बाल्कनी ग्रुप'ला मोठा झटका! 9 व्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रेची 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट; रडून रडून बेहाल झाला सागर