साखरपुड्याच्या 5 महिन्यांनी पवित्रा पुनियाने दाखवला दाजींचा चेहरा, थेट शेअर केला लिपलॉक करतानाचा फोटो, तुम्ही पाहिला का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Pavitra Punia Fiance: एजाज खानसोबतचं तिचं गाजलेलं नातं तुटल्यानंतर पवित्रा पुन्हा एकदा प्रेमात पडली असून तिचा गुपचूप साखरपुडा देखील झाला आहे.
advertisement
1/8

टेलिव्हिजन विश्वातील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री आणि बिग बॉस १४ फेम पवित्रा पुनिया सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. एजाज खानसोबतचं तिचं गाजलेलं नातं तुटल्यानंतर पवित्रा पुन्हा एकदा प्रेमात पडली असून तिचा गुपचूप साखरपुडा देखील झाला आहे.
advertisement
2/8
गेल्या पाच महिन्यांपासून तिने आपल्या होणाऱ्या पतीचा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. पवित्राच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आता अखेर तो मिस्ट्री मॅन कॅमेऱ्यासमोर आला आहे.
advertisement
3/8
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पवित्राने सोशल मीडियावर आपल्या साखरेपुड्याचे काही फोटो शेअर केले होते. एका सुंदर बीचवर सूर्यास्ताच्या साक्षीने तिला एका तरुणाने प्रपोज केलं होतं. मात्र, या फोटोंमध्ये त्या तरुणाचा चेहरा दिसत नव्हता.
advertisement
4/8
आता तब्बल ५ महिन्यांनंतर स्वतः पवित्राचा होणारा नवरा जसकोमल सिंह याने सोशल मीडियावर या ड्रीमी प्रपोजलचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. "जसा सूर्य मावळला, तशीच आमच्या एका नवीन आयुष्याची पहाट झाली," असं रोमँटिक कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
advertisement
5/8
पवित्राचा होणारा नवरा नेमका करतो काय? याची चर्चा सध्या रंगली आहे. जसकोमल हा एक यशस्वी बिझनेसमॅन असून तो प्रामुख्याने अमेरिकेत स्थायिक आहे. मनोरंजन क्षेत्राशी त्याचा थेट संबंध नाही, मात्र त्याला कलेची प्रचंड आवड आहे.
advertisement
6/8
जसकोमलने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये 'आर्टिस्ट' असं लिहिलं आहे. त्याच्या प्रोफाईलवर अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंचे कलेक्शन पाहायला मिळते, ज्यावरून त्याला संगीताची आवड असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
7/8
खरं तर पवित्रा २०२६ च्या सुरुवातीलाच लग्नबंधनात अडकणार होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात तिच्या आजीचं निधन झालं. यामुळे तिने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. "हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं वळण आहे आणि मी या नवीन प्रवासासाठी खूप उत्साही आहे," असं पवित्राने एका मुलाखतीत म्हटलं होतं. लग्नानंतर पवित्रा अभिनयाला रामराम ठोकून पतीसोबत अमेरिकेत सेटल होणार असल्याचीही चर्चा आहे.
advertisement
8/8
बिग बॉस १४ च्या घरातून सुरू झालेलं पवित्रा आणि एजाज खान यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर आणि साखरपुडा झाल्यानंतर या दोघांनी अचानक आपली वाट वेगळी केली. या ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरत पवित्राने आता जसकोमलच्या रूपात आपलं खरं प्रेम शोधलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
साखरपुड्याच्या 5 महिन्यांनी पवित्रा पुनियाने दाखवला दाजींचा चेहरा, थेट शेअर केला लिपलॉक करतानाचा फोटो, तुम्ही पाहिला का?