TRENDING:

लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, सतत होते तुलना, अखेर अभिनयने चाहत्यांसमोर जोडले हात, म्हणाला...

Last Updated:
Laxmikant Berde Abhinay Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अर्थात अभिनेता अभिनय बेर्डेचा 'उत्तर' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान वडिलांसोबत तुलना करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य अभिनयने केलं आहे.
advertisement
1/7
लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, सतत होते तुलना, अखेर अभिनयने चाहत्यांसमोर जोडले हात
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. 'ती सध्या काय करते' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 'अशी ही आशिकी','रंपाट' या चित्रपटांतही त्याने काम केलंय.
advertisement
2/7
अभिनय बेर्डेचा 'उत्तर' हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनयसह रेणुका शहाणे या चित्रपटाच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मायलेकाच्या लडिवाळ नात्याची गुंफण या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
advertisement
3/7
वडिलांचा वारसा पुढे नेत अभिनयने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असली तरी अनेकदा त्याची वडिलांसोबत तुलना केली जाते. आता नुकतंच एका मुलाखतीत त्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत होणाऱ्या सततच्या तुलनांवर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/7
लक्ष्मीकांत बेर्डें सोबतच्या तुलनांवर अभिनय बेर्डे म्हणाला,"मला सुरुवातीला या जबाबदारीची खूप भीती वाटायची. लोक मला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होते आणि मी स्वत:ला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होतो. पण त्यावेळी मला स्वत:सोबत राहणं खूप गरजेचं होतं. मला माझ्या पद्धतीने वेगळेपण जपणं खूप गरजेचं होतं. हे वेगळेपण जर मी जपलं नसतं तर कदाचित मी आता जी काही माझी वेगळी वाट करू पाहतोय ते झालं नसतं".
advertisement
5/7
अभिनय म्हणाला,"मी माझ्या वेगळेपणासोबत खूप जोडला गेलो होतो. मला माझं काहीतरी वेगळं स्वतंत्र करायचं आहे. स्वत:चं स्वतंत्र करिअर बनवायचं आहे या गोष्टीवर मी खूप ठाम होतो. तसेच मला खूप चांगले दिग्दर्शकही मिळाले. जे माझ्या वेगळेपणाला जपत होते. माझ्या वेगळेपणातून काहीतरी काढू पाहत होते. या दिग्दर्शकांमुळे, लेखकांमुळे मला आधी जे बर्डन वाटायचं ते आता वाटत नाही".
advertisement
6/7
अभिनय पुढे म्हणाला,"तुम्ही जर माझी आणि माझ्या वडिलांची तुलना करत असाल तर त्यात चूक तुमची आहे. कारण त्यांच्यावेळचा काळ वेगळा होता. त्यांची शैली वेगळी होती. त्यांचं एक वेगळं व्यक्तीमत्त्व होतं. मी वेगळा आहे.. काहीतरी वेगळं करू पाहतोय. हात जोडून विनंती करतो की तुम्ही मलाही एक संधी द्या".
advertisement
7/7
अभिनय बेर्डेने 2017 मध्ये 'ती सध्या काय करते' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला 'सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष' हा पुरस्कार मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा, सतत होते तुलना, अखेर अभिनयने चाहत्यांसमोर जोडले हात, म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल