ऐश्वर्या-करिष्मा नाही या अभिनेत्रीवर होतं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, वडिल अमिताभसोबत दिला होता हिट पिक्चर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhishek Bachchan First Love : अभिनेता अभिषेक बच्चनचं करिष्मा कपूरसोबत लग्न मोडलं. त्यानंतर त्याने ऐश्वर्या रायबरोबर संसार थाटला. पण तुम्हाला माहिती आहे का अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम कोणत्या अभिनेत्रीवर होतं?
advertisement
1/9

अभिनेते म्हटल्यावर त्यांची अफेअर्स आणि लग्न हा चर्चेचा विषय असतो. आपल्या लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिलेला अभिनेता अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर यांचं अफेअर खूप गाजलं. दोघांचा साखरपुडाही झाला होता. करिष्माला बच्चन कुटुंबाची सून म्हणून ओळखही करून दिली होती.
advertisement
2/9
करिष्मा कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेक बच्चनने अभिनेत्री ऐश्वर्या रायबरोबर लग्न केलं. ऐश्वर्याबरोबर तो सुखाचा संसार करतोय. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या ही मुलगी आहे.
advertisement
3/9
पण तुम्हाला माहिती आहे ऐश्वर्या आणि करिष्माच्या अभिनेता अभिषेक बच्चन एक वेगळ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात होता. ही अभिनेत्री बॉलिवूडची स्टार अभिनेत्री होती. अमिताभ बच्चनबरोबर तिने हिट सिनेमे केले होते.
advertisement
4/9
[caption id="attachment_1416716" align="aligncenter" width="1200"] अभिषेक बच्चन त्या अभिनेत्रीच्या इतका प्रेमात होता की त्याने तिच्याबरोबर झोपायचं आहे असंही सांगितलं होतं. त्यावर अभिनेत्रीनं जो काही रिल्पाय दिला तो अभिषेकच्या आजही लक्षात आहे. कोण होती ती अभिनेत्री जिच्या प्रेमात होता अभिषेक बच्चन</dd> <dd>[/caption]
advertisement
5/9
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने लाखो चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. त्याच काळातील एक मोठं नाव म्हणजे अभिनेत्री झीनत अमान. तिच्या ग्लॅमरस अंदाजाने 70 आणि 80 च्या दशकात अनेकांचा हृदयाचा ठोका चुकवला. अभिषेक बच्चन देखील लहानपणी तिच्या प्रेमात पडला होता.
advertisement
6/9
साजिद खानला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला होता, माझी पहिली पहिला क्रश झीनत अमान होती. त्या काळात अमिताभ बच्चन 'महान' सिनेमाचं काठमांडूमध्ये शूटींग करत होते. तिथे अभिषेकची झीनत अमानशी पहिली भेट झाली होती.
advertisement
7/9
अमिताभ बच्चन छोट्या अभिषेकला काठमांडूला शूटींगसाठी घेऊन गेले होते. छोटा अभिषेक झीनतच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. एकदा रात्री झीनत झोपायला जात असताना, त्याने निरागसपणे विचारले, "मी तुमच्यासोबत झोपू का?"
advertisement
8/9
अभिषेक हसत हसत म्हणाला, "तेव्हा मी एवढा लहान होतो की कोणीतरी एकटं झोपतं ही कल्पनाही मला नव्हती." मी त्यांना असं विचारल्यानंतर त्या मला म्हणाल्या, आधी मोठा हो. अभिषेकच्या आयुष्यातील ही सर्वात मजेदार आणि लक्षात राहणारी घटना असल्याचं अभिषेकनं सांगितलं.
advertisement
9/9
झीनत अमान ही 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक होती. तिची आणि अमिताभ बच्चन यांची जोडी त्या काळात बॉलीवूडची सुपरहिट जोडी होती. 'डॉन', 'दोस्ताना', 'लावारिस' सारख्या अनेक सिनेमांत दोघांनी एकत्र काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐश्वर्या-करिष्मा नाही या अभिनेत्रीवर होतं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, वडिल अमिताभसोबत दिला होता हिट पिक्चर