डान्स छान पण...! रिंकू राजगुरूची लावणी पाहून फॅन्सनी घेतली शाळा, थेट केली अमृता खानविलकरशी तुलना
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकताच तिचा लावणी करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. तिचा डान्स पाहून चाहत्यांनी तिलं ट्रोल केलं आहे.
advertisement
1/9

अभिनेत्री रिंकु राजगुरूचा 'आशा' हा सिनेमा नुकता रिलीज झाला आहे. या सिनेमाला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिंकूने या सिनेमात आशा सेविकांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रिंकूचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
advertisement
2/9
एकीकडे आशा सिनेमातील रिंकू तर दुसरीकडे रिंकूचा आणखी एक नवा अंदाज पाहायला मिळाला. काही दिवसांआधी रिंकूने एक डान्स व्हिडीओ शेअर केला होत. या व्हिडिओला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.
advertisement
3/9
त्यानंतर आता रिंकूने पुन्हा एकदा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी रिंकू थेट लावणीवर थिरकली आहे. लावणी किंग आशिष पाटीलबरोबर तिचा लावणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
4/9
दरम्यान रिंकूला लावणीवर डान्स करताना तिच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. रिंकूची एक वेगळी साइड यातून पाहायला मिळाली. 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर रिंकूनं डान्स केला आहे. पुन्हा एकदा रिंकूची अदाकारी यात पाहायला मिळाली.
advertisement
5/9
"आपल्या पिढ्यांचा वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद वाटत आहे", असं कॅप्शन देत रिंकूने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
6/9
पोस्टमध्ये रिंकूने आशिष पाटीलचेही आभार मानलेत. तिनं लिहिलंय, "माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी, मला हे करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल आशिष पाटील तुझे मनापासून आभार". रिंकूने पुढे लिहिलंय, "कोणतीही मोठी तयारी नाही, फक्त जिद्द आणि आवड. अवघ्या 2 तासांची प्रॅक्टिस आणि शूट"
advertisement
7/9
रिंकूची नृत्याप्रती असलेली आवड आणि प्रेम पाहता तिनं केलेला प्रयत्न तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण दुसरीकडे रिंकूला ट्रोलही करण्यात आलंय.
advertisement
8/9
डान्स उत्तम आहे पण रिंकूचे एक्सप्रेशन्स कमी पडले असं म्हणत चाहत्यांनी ट्रोल केलंय. एका युझरनं लिहिलंय, "थोडे डोळ्याच्या expression आणखी हवे.. बाकी सर्व खूप छान." दुसऱ्यानं लिहिलं, "रिंकू जरा एक्सप्रेशन विसरले का तुम्ही, लिप्सिंग नाही बरोबर वाटतं."
advertisement
9/9
आणखी एकानं थेट अमृता खानविलकरशी तुलना केली आहे. लिहिलंय, "अजून एक्सप्रेशन्स व्यवस्थित नाही. एक्सप्रेशन्सच्या बाबतीत अमृता खानविलकर टॉपवर आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डान्स छान पण...! रिंकू राजगुरूची लावणी पाहून फॅन्सनी घेतली शाळा, थेट केली अमृता खानविलकरशी तुलना